नांदेड- नांदेड शहराचे वैभव असलेल्या जुना मोंढा टॉवरवरील मागील अनेक दिवसांपासून बंद असलेले ऐतिहासिक घड्याळ सुरू करून टॉवर परिसराचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पूर्वी या घड्याळाच्या वेळेनुसार जुना मोंढ्यातील काम चालायचे. परंतु नंतर हे घड्याळ बंद पडले. याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केले. घड्याळ सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
तरोडा, सांगवी झोनकडून कारवाई
नांदेड- क्षेत्रीय कार्यालय, तरोडा सांगवी झोन क्रमांक १ च्या पथकाने लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या ३० दुकानांवर कारवाई करून सील केले. त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सहायक आयुक्त संजय जाधव, पोलीस निरीक्षक ननावरे व त्यांच्या पोलीस कर्मचारी, करनिरीक्षक साहेबराव ढगे, मनोहर दंडेवार, सतीश महागळे, बालाजी रत्नपारखी, सादुला खान, शुभम वाघमारे, विठ्ठल तिडके, सुनील टेकाळे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.