नांदेड : बार्टी, पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लावूया रोपे, करून संवर्धन, मिळेल प्राणवायू, जपूया पर्यावरण’ या संकल्पनेद्वारे लोकसहभागातून ५ ते २० जून या कालावधीत वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामठा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विनोद पाचंगे, अमित कांबळे, सरपंच अर्चना भाडेकर, छबूबाई पुयड, किशन पुयड आदी उपस्थित होते.
मधुकर हणवते यांचा सत्कार
नांदेड : सहकार खात्याचे लेखापरीक्षक एस. एम. हणवते हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा विशेष लेखापरीक्षक एम.के. कांबळे, डी.ए. बैस ठाकूर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक एम.डी. कदम, सुधाकरराव हंबर्डे, माधवराव कल्याणकर, बी.व्ही. पोतदार आदींनी परिश्रम घेतले.
सुगाव येथे वृक्षारोपण
नांदेड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गटशिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी के.के. फटाले, केंद्रप्रमुख टी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा, सुगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जी. एस. मंगनाळे, दत्तराम पाटील जाधव, राजू पाटील जाधव, गणेश जाधव आदी उपस्थित होते.
पेरणीसाठी बियाणे खरेदीची लगबग
नांदेड : मृक्ष नक्षत्राला प्रारंभ झाल्याने बळीराजा आता पेरणीपूर्व मशागत आटोपून पेरणीच्या तयारीला लागला आहे. सध्या शेतकरी बियाणे व खतखरेदी करण्यासाठी नवामोंढ्यात गर्दी करीत आहेत. शहरातील खते व बियाणे केंद्रावर सोमवारी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. यंदा रोहिण्या नक्षत्र बरसल्यानंतर मान्सूनचे वेळेवर आगमन झाले आहे.
पावसाने शेतकरी समाधानी
नांदेड : लिंबगाव, महिपाल पिंपरी, निळत्त आदी भागात ४ जून रोजी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीची तयारी करीत असल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्राला सोमवारी सुरुवात झाल्यामुळे आता शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला आहे.
लांबपल्ल्याच्या बसेस सुरू
नांदेड : कोरोना महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य परिवहन मार्ग महामंडळाची बससेवा ७ जूनपासून सुरू झाली असून, नांदेड जिल्ह्यातून लातूर, साेलापूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, नागपूर आदी मार्गावरील बससेवा सुरू झाली आहे. प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळून प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
मनपा शाळेत वृक्षारोपण
नांदेड : महापालिकेच्या प्राथमिक शाळा, गणेशनगर येथे मुख्याध्यापिका कल्पना मुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी परमेश्वर गाेणारे, उद्यान उपायुक्त बेग, निरीक्षक महाबळे, मोहनसिंह ठाकूर, सय्यद खाजा, अशोक भुजबळे, एकनाथ घुले, युनूस खान, महेबूब खान, गणेश साडेगावकर, वंदना शिंदे आदी उपस्थित होते.