नांदेड- महापालिका हद्दीत असलेल्या सिडको परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागातील नागरिकांना, वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यामुळे तारेवारची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हिंदी दिवस साजरा
नांदेड- राजीव गांधी महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने विश्व हिंदी दिवसीय निमित्ताने डॉ. सुजितसिंह परिहार यांचे व्याख्यान पार पडले. अध्यक्षस्थानी प्रार्चाय डॉ. रमेश कदम होते. डॉ. परिहार म्हणाले, हिंदी भाषा राष्ट्रभाषा अभिजात भाषा व ज्ञानभाषा म्हणून अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. प्रास्ताविक प्रा. डॉ. लक्ष्मण काळे यांनी केले. प्रा. डॉ. साईनाथ शाहूल यांनी आभार मानले.
कचर्याचे ढिगारे
नांदेड- बळीरापूर ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे ढिगारे साचले असून स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. कचऱ्याची साठवणूक करण्यासाठी कुंड्यांची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच कचरा टाकण्यात येत आहे. बळीरापूर गावात प्रवेश करण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याशेजारी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. या ठिकाणी काटेरी झुडपे वाढली आहेत.
पतंग महोत्सवाचे आयोजन
नांदेड- मकरसंक्रांतीच्या निमित्ताने १७ जानेवारी रोजी प्रथमच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पतंग महोत्सावानंतर विजेत्यांना राेख पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लब नांदेड मीड टाऊनचे अध्यक्ष जुगलकिशोर अग्रवाल, संजय अग्रवाल, ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली. हा महोत्सव रविवारी नवामोंढा मैदानावर दुपारी १ ते४ च्या दरम्यान आयोजित केला आहे.