नांदेड : देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक गया कोकरे, बी.एस. गोडबोले, राहुल कोकरे, संजय कदम, गायक क्रांतिकुमार पंडित उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी माता रमाई यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.
सिद्धांतनगरात पथदिवे बसविण्याची गरज
नांदेड : तरोडा खु. भागातील सिद्धांतनगर येथे अंतर्गत रस्त्यावर विद्युत खांब नसल्याने अनेकांच्या प्लाट तसेच घरावरून विद्युत वाहिनी गेली आहे. त्यामुळे अपघाताची भीती आहे. सध्या या भागात घरांचे बांधकाम सुरू असून या विद्युत वाहिनी काढण्याची मागणी केली आहे.
थंडी वाढल्याने शेकोट्या पेटल्या
नांदेड : मागील पाच सहा दिवसापासून थंडी वाढल्याने ग्रामीण भागात ठिकठिकाणी पुन्हा शेकोट्या पेटल्या असून शहरातही नागरिक पुन्हा उबदार कपडे घालून रात्री बाहेर पडत आहेत. अचानक थंडी वाढल्याने सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत.
तुंगार यांना श्रद्धांजली
नांदेड : डाॅ. देवदत्त तुंगार यांना स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डाॅ. वाघमारे, डाॅ. बी. आर. सूर्यवंशी, डाॅ. दीपक शिंदे, डाॅ. अशोक कदम, डाॅ. राजेंद्र गोणारकर, डाॅ. सुहास पाठक आदी उपस्थित हाेते.
युथ फेस्टिवल सुरू
नांदेड : शिख एज्युकेशन वेलफेअर असोसिएशन सेवा संस्थेच्या वतीने ७ फेब्रुवारी रोजी खालसा हायस्कूल मैदानावर प्रारंभ झाला. उद्घाटन संत बाबा कुलवंतसिंघजी, संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा तेजसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य देवदत्त तुंगार यांना श्रद्धांजली
नांदेड : आर्य समाज विचारवंत, पत्रकार, तथा माजी प्राचार्य डाॅ. देवदत्त तुंगार यांना पीपल्स काॅलेज येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य डाॅ. आर. एम. जाधव, प्रा. डाॅ. बालाजी कोंमलवार, डाॅ. अशोक सिद्धेवाड, प्रा. के. एम. जी सुबानी, डाॅ. पंढरी गड्ड्पवार यांच्यासह इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन
नांदेड : नांदेड कल्ब व नांदेड जिल्हा शहर टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या नांदेड क्लब मैदानावर सुरू झालेल्या कोहिनूर खुल्या टेनिस स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी, आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना जनजागृती
नांदेड : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध योजनांची प्रसिद्धी लोककला व पथनाट्य संस्था नांदेड जिल्हा गोंधळी समाज सुधारक संघटनेकडून २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान कोरोना विषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
मनोज बोरगावकर यांचा सत्कार
नांदेड : येथील प्रसिद्ध कवी प्रा. मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. बोरगावकर यांचा शिक्षण विस्तार अधिकारी तथा कवी व्यंकटेश चाैधरी, अरूण अतनुरे, साहित्यिक विजय चव्हाण, मुख्याध्यापक व्यंकट गंदपवाड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.