त्यातच आता महावितरणने महापालिकेवर वक्रदृष्टी टाकली आहे. मार्चमध्ये थकीत वीजबिल वसुलीसाठी शहरातील पथदिवे बंद करण्यात आले होते. पुन्हा आता तीन महिन्यांनंतर महावितरणने कारवाईचा इशारा दिला आहे. महापालिकेकडे पाणीपुरवठा योजनेचे ४५ कोटी १६ लाख तर पथदिव्यांच्या वीजपुरवठ्याचे ८ कोटी ९० लाख रुपये थकीत आहेत. महापालिकेकडे लघुदाब वर्गवारीतील पथदिव्यांचे ६६३ कनेक्शन आहेत. या जोडण्यांची ८ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे, तर लघुदाब वर्गवारीवरील पाणीपुरवठा योजनांचे १८४ कोटी वीज कनेक्शन आहे. त्यांच्याकडे १ कोटी ६ लाख रुपये थकीत आहेत. उच्चदाब वर्गवारीतील पाणीपुरवठ्याची १५ कनेक्शन आहेत. या कनेक्शनचे ४४ कोटी १० लाख रुपये थकीत आहेत. महावितरणची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
चौकट ----------------
दोन वर्षांत एकही देयक दिले नाही
महापालिकेने गेल्या दीड ते दोन वर्षांच्या काळात विजेचे एकही पूर्ण देयक दिलेले नसल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा काळ पाहता, दोन वर्षांत महावितरणने महापालिकेला सहकार्यच केले आहे. मागणी एवढे देयक न दिल्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढतच चालला आहे. महापालिकेस पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकी भरण्यासाठी महावितरणने वारंवार पत्राद्वारे व प्रत्यक्ष संवाद साधत थकबाकी भरण्याबाबत सूचना केली. मात्र, अद्याप रकमेचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चौकट---------------
चालू वर्षाचे देयक केले अदा
महापालिकेने महावितरणचे चालू वर्षाचे देयक अदा केल्याचा दावा केला आहे. यापूर्वीचीच थकबाकी राहिली असून, ती भरण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे म्हटले आहे. कोरोना संकटात मनपाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. त्यामुळे थकबाकी राहिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच वेळी मनपा विद्युत विभागाने वीज देयके लेखा विभागाला पाठविली आहेत. आर्थिक नियोजन त्यांच्याकडे असल्याचे कार्यकारी अभियंता माधव बाशेट्टी यांनी सांगितले.