लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : देखण्या स्वागत कमानी़़़ फुलांचा दरवऴ़़ प्रसादाचा घमघमाट़़़ भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध जत्थे़़़ मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष़़़ नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा़़़ अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी अंतरऊर्जा यांचा दैवीसंगम़़़ अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात शहरातील गाडीपुरा भागातून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती़दुपारी दोन वाजता महाआरती झाल्यानंतर आकर्षक देखाव्यांचे रथ असलेल्या या शोभायात्रेला सुरुवात झाली़ जुना मोंढा टॉवर, महावीर चौक, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर आदी भागात शोभायात्रेवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली़ शोभायात्रेतील एका रथावर सुरु असलेल्या सुमधुर भजनामुळे रामभक्त तल्लीन झाले होते़ रात्री आठ वाजेच्या सुमारास शोभायात्रा शिवाजीनगर ओव्हरब्रीजवर होती़ यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक सहभागी झाले होते़तिरंगा ध्वजाने वेधले उपस्थितांचे लक्षशोभायात्रेत सहभागी तरूणांनी मोठ्या आकाराचा तिरंगा ध्वज हातात घेवून फडकवला़ चौका- चौकात तरूणांनी उत्स्फूर्तपणे समोर येत तिरंगा ध्वज हातात घेऊन ज्याप्रकारे फडकावला ते पाहून सर्वांचीच छाती गर्वाने फुगली़ देशप्रेमाची भावना जागृत करत भव्य तिरंगा फडकावण्याचे धाडस करणाºया तरूणांचे उपस्थितांनी कौतुक केले.रामभक्तांनी केली स्वच्छताअत्यंत शिस्तबद्धरीत्या गाडीपुरा भागातून निघालेल्या शोभायात्रेत सर्वात समोर प्रभू श्री रामचंद्रांची पालखी त्यानंतर झेंडा आणि ढोल-ताशा पथक त्यापाठोपाठ शहिदांचा सजीव देखावा, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा, वानरसेना, डीजे, भजनी मंडळ आणि सर्वात शेवटी श्री रामांची भव्य मूर्ती एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ठेवण्यात आली होती़ जसजशी शोभायात्रा समोर जात होती़ तसतसे पाठीमागे असलेले रामभक्त हातातील झाडूने रस्त्यांची स्वच्छता करीत होते़ रस्त्यावर पडलेले पाणी पाऊस उचलत होते़ या स्वच्छतादूतांकडे पाहून अनेकांनी मग रस्त्यावरील कचरा उचलण्यास हातभार लावला़अवघे शहर झाले भगवे़़़़श्रीराम नवमीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आयोजकांनी तयारी सुरु केली होती़ शनिवारी शहरातील सर्वच रस्त्यांवर भगव्या पताका आणि झेंडे लावण्यात आले होते़ शनिवारी रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ त्यानंतर सकाळपासून रामभक्त दुचाकीवर भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करीत होते़ शोभायात्रेच्या मार्गावर सर्वत्र भगवे झेंडे दिसत होते़ रात्री नऊ वाजेच्या सुमारास शोभायात्रा शिवाजीनगर भागात आली़ शिवाजीनगरचा एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी दुपारपासूनच बंद करण्यात आला होता़ पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजीनगरपासून ते वर्कशॉपपर्यंत रस्त्याच्या दुभाजकावर कठडे लावले होते़ त्याचबरोबर मुख्य रस्त्याला जोडणारे सर्व छोटे रस्ते कठडे लावून वाहनांसाठी बंद करण्यात आले होते़ त्यामध्ये रुग्णवाहिकेला मात्र सूट देण्यात आली होती़ रात्री उशिरापर्यंत रामभक्तांचा हा जल्लोष सुरु होता़महाप्रसादाचा लाभगाडीपुरा येथील हनुमान मंदिर ते शासकीय विश्रामगृह दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, धार्मिक संघटनांच्या वतीने रामभक्तांसाठी महाप्रसाद आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ कलामंदिर भागात रक्तदान शिबीर, मोफत तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते़ यावेळी हजारो रामभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़
श्रीरामाच्या जयघोषाने नांदेड शहर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:38 AM
देखण्या स्वागत कमानी़़़ फुलांचा दरवऴ़़ प्रसादाचा घमघमाट़़़ भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध जत्थे़़़ मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष़़़ नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा़़़ अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी अंतरऊर्जा यांचा दैवीसंगम़़़ अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात शहरातील गाडीपुरा भागातून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती़
ठळक मुद्देश्रीराम जन्मोत्सवाचा नांदेडात जल्लोष, हजारो भाविकांचा सहभाग, तरुणाईचा उत्साह शिगेला