शहरं
Join us  
Trending Stories
1
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."
3
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
5
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
6
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
7
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
8
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
9
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
10
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
11
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
12
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
13
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
14
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
15
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
16
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
18
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
19
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
20
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

सुटकेचा नि:श्वास! मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 7:28 PM

२००८ मध्ये एका वादातून तो तुरुंगात गेला अन् कुख्यात आरोपींच्या संपर्कात येऊन त्याचे आयुष्यच बदलून गेले.

नांदेड: खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाच्या साथीदारांनी येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला नोव्हेंबरमध्ये सात महिने होतात. शनिवारी बियाणी यांचा जन्मदिवस होता. त्यानिमित्त शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. योगायोग म्हणजे शनिवारीच रिंदा याचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नांदेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला.

हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा हा पंजाबमधील तरणतारण येथील रहिवासी होता. २००८ मध्ये एका वादातून तो तुरुंगात गेला अन् कुख्यात आरोपींच्या संपर्कात येऊन त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्यापूर्वी तो सामान्य जीवन जगत होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो नांदेडात आला. त्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात एक-एक पाऊल टाकण्यास त्याने सुरुवात केली. खलिस्तानीच्या नावावर त्याने येथील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माळी कुटुंबीयासोबतच्या पूर्ववैमनस्यातून त्याने बच्चितरसिंघ माळी यांचा खून केला. तसेच माळी कुटुंबीयांशी घनिष्ट संबंध असलेल्या अनेकांना धमकाविणे, गोळीबार केला. मात्र, पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्याची हिमंत वाढतच गेली. त्यानंतर त्याने खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्याचा सपाटा लावला. त्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार केला होता. आजही कोकुलवार हे अंथरुणाला खिळून आहेत. त्याचबरोबर शहरातील इतरही व्यापाऱ्यांवर गोळीबाराच्या घटना घडल्या. 

रिंदाच्या दहशतीने अनेकांनी त्याला कोट्यवधींची खंडणी दिली. तर काहीजण पोलिसांकडे गेले. पोलिसांकडून अशा व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात आली; परंतु सर्वाधिक खळबळ उडाली ती ५ एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येने. बियाणी यांना रिंदाने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती; परंतु खंडणी मिळत नसल्याने अद्दल घडविणे आणि दहशत कायम ठेवणे, या उद्देशाने त्याच्या साथीदारांनी घरासमोरच बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या. बियाणी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या प्रकरणात पोलिसांवरही प्रचंड दबाव होता. एसआयटीने या प्रकरणात एक-एक कडी जोडत आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली. तर दिल्ली पोलिसांनी एका शार्प शूटरला पकडले. तर रिंदा यांचा पाकीस्तानात मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे गेली काही वर्षे दहशतीत असलेल्या नांदेडकरांनीही सुटकेचा श्वास सोडला.

२०२० मध्ये पाकीस्तानातरिंदा हा २०२० मध्ये पाकिस्तानात पळून गेल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी आयएसआयच्या इशाऱ्यावरून तो भारतात देशविघातक कारवाया करीत होता. 

पंजाबला २३ गुन्ह्यांत हवा होता रिंदापाकिस्तानमध्ये गेल्यानंतर खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी करणाऱ्या रिंदावर पंजाबमध्ये खून, खंडणी, लूटमार असे जवळपास २३ गुन्हे दाखल आहेत. पंजाबमध्ये रुपनगर, पटीयाला, लुधियाना आणि जालंधर या परिसरात त्याची दशहत होती. लुधियाना न्यायालय, मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणातही रिंदाचा सहभाग होता. नांदेडमध्येही रिंदावर खून, खंडणी यासह अनेक गुन्हे आहेत.

शार्प शुटरचा शोध सुरुअन्य एक शार्प शूटर आणि मुख्य आरोपी रिंदा हा फरार होता. त्यातच शनिवारी संजय बियाणी यांच्या जन्मदिवशीच रिंदाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकले.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादी