नांदेड: मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मागील दोन दिवसांपासून पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पावसाने सीता आणि पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस हिमायतनगर तालुक्यात पडला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही.लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला होता़ त्यानंतर ७ जून ते ११ जून दरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता़ हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवित गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत नांदेड शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला़ त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते़हवामान विभागाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ६ ते ११ जूनदरम्यान मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला होता़ त्यानंतर ६ जूनच्या रात्री नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती़ तासभर झालेल्या पावसाने दाणादाण उडाली होती़त्यानंतर ७ जूनला दिवसभर ढगाळ वातावरणानंतर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वादळीवारा, विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती़ पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता़ त्यानंतर मात्र संततधार सुरु होती़ शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती़ त्यामुळे शहरातील कलामंदिर, वजिराबाद, श्रीनगर, भाग्यनगर, बाबानगर, हमालपुरा, देगलूर नाका, हिंगोली गेट इ. भागांत रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते़ सखल भागातील नाल्याही ओसंडून वाहत होत्या़ दुपारी बारा वाजेनंतर मात्र पावसाने उघडीप दिली़चिमुकल्यांनी लुटला आनंद -सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरु असलेल्या पावसाचा शालेय विद्यार्थ्यांनी आनंद लुटला़ आपल्या पाल्याला शाळेत पोहोचविण्यासाठी पालकांना बरीच कसरत करावी लागली़ त्यात चौकांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक दुचाकी मध्येच बंद पडत होत्या़----कापूस लावण्याची लगबग सुरुहिमायतनगर : तालुक्यात चार दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने शेतातून पाणी वाहून निघाले असल्याने शेतकरीबांधवांनी कापूस लावण्यासाठी एकच घाई केली.गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतातून पाणी वाहिले़ अनेकांची शेती खरडून गेली.शेतात चिखल झाल्याने औत चालणे कठीण गेले.बांधव काळ्या आईची ओटी भरण्यासाठी उसणवारी करुन बाजारातून बियाणे आणत आहेत़ अनेक शेतकरी दोरीच्या साह्याने सरकी (कापूस) लावण्यासाठी लगबग सुरु केली आहे. अनेक शेतकरी बियाणे आणण्यासाठी कृषीकेंद्रात गर्दी करताना दिसत आहेत़ बोअर, विहिरीला पाणी वाढले़ पाणीटंचाईच्या झळा कमी झाल्या असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.---१३२ के़व्ही़उपकेंद्रात बिघाडकौठा परिसरातील वीजतारा तुटल्याने रात्री २:५२ पासून ११ केव्ही खडकपुरा, ११ केव्ही गुरूद्वारा, ११ केव्ही सोमेश कॉलनी तसेच ११ केव्ही वजिराबाद वीजवाहिनीवरील सर्व परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी ११ पर्यंत पाऊस सुरूच असल्यामुळे वीजतारा ओढण्यामधे अडचणी निर्माण होत होत्या. अशा अवस्थेतही महावितरणच्या कर्मचाºयांनी भर पावसात वीजतारा जोडण्यास दुपारी ४ वाजता यश मिळविले. काही वीजवाहिन्यांचा पर्यायी वीजवाहिनीवरून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र महापारेषणच्या १३२ केव्ही इलीचपूर उपकेंद्रामधील रोहित्रामधे बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा बंद झाला. रोहित्र दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजता इतर भागांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला़---कंधार तालुक्यात सलग पाऊसकंधार : दोन दिवसांत झालेला सर्वाधिक पाऊस बारूळ मंडळात झाला़ त्यानंतर उस्माननगर व कंधार मंडळात मोठी हजेरी झाली़ ८ जूनच्या पावसाची तालुका सरासरी नोंद ३५़५ मि़मी़ झाली़ पुन्हा दुपारपर्यंत (वृत्त लिहिपर्यंत) संततधार पाऊस चालू होता़ ८ जून रोजी रात्री १ वाजेनंतर पाऊस सुरू झाला़ त्यात कंधार व उस्माननगर पर्जन्यमापक यंत्रावर प्रत्येकी ४५ मि़मी़ ची नोंद झाली़ बारूळ ४०, फुलवळ २२, पेठवडज २२ व कुरुळा २१ मि़मी़ची नोंद झाली़ आतापर्यंत झालेल्या पावसाची सर्वाधिक नोंद बारूळ १४५ मि़मी़, कंधार १४१, उस्माननगर १३८, फुलवळ ९७, पेठवडज ४७ व कुरुळा २१ मि़मी़ पाऊस झाला़---मुखेड तालुक्यात सर्वत्रच पाऊसमुखेड : ७ जूनच्या मध्यरात्री पडलेल्या पावसाने सर्व तालुकाभर हजेरी लावली. एका दिवशीच १७२ मि.मी़ पावसाची तालुक्यात नोंद झाली. वादळीवाºयाने भयान रुप धारण केले. मंडळनिहाय पाऊस असा: मुखेड ३९ (५७), जांब बु ३२ (३६), चांडोळा २५ (३६), बाºहाळी २१ (२१), येवती २४ (२४), जाहूर १८ (२३), मुक्रमाबाद १३ (२५), एकूण ७ जूनचे एका दिवसाचे पर्जन्यमान १७२ मि.मी. तर १ जूनपासून २२२ मि.मी. पर्जन्याची नोंद करण्यात आली. तर एका दिवसात पावसाची नोंद २४़५७ टक्के तर १ जूनपासून पर्जन्याची नोंद ३१़७१ टक्के मि.मी़ झाली.---शहापूर मंडळात ४५ टक्के पाऊसदेगलूर तालुक्यातील सर्वच भागात गुरुवारी रात्री पाऊस झाला असून शहापूर मंडळात ४५ मि. मी. पाऊस झाला आहे. गुरुवारी रात्री शहापूर मंडळात ४५ मि. मी., देगलूर १७ मि. मी., खानापूर १७ मि. मी., माळेगाव १५ मि. मी., मरखेल १४ मि. मी., हणेगाव ८ मि. मी., असा एकूण ११६ मि. मी. पाऊस सहा मंडळात पडला.त्याची सरासरी १९़३३ टक्के आहे. बेंम्बरा, मानूर परिसरात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत असून या भागातील शेतकरी पेरण्यास प्रारंभ करण्याची शक्यता आहे.---उमरी तालुक्यात दोन दिवसांत ६० मि़मी़ पावसाची नोंदउमरी : बुधवार तसेच गुरुवारी रात्री उमरी व तालुक्यात सर्वदूरपर्यंत पाऊस झाला असून नदी-नाले व तलावांना पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे़ उमरी तालुक्यातील उमरीसह सिंधी, गोळेगाव या तीन सर्कलमध्ये सरासरी ६० मि़मी़ एवढ्या पावसाची नोंद झाली़ पावसाने तालुक्यात अनेक नदी-नाल्यांना पाणी आले़ सध्यातरी जनावरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी साचले़ शेतकºयंनी आता बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली असून यावर्षी खरीप हंगामाची पेरणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत़ तालुक्यात बितनाळ, शिरूर, जिरोणा, सावरगाव भागात कापूस लावणीला सुरुवात झाली आहे़ पुढील एक-दोन दिवस असाच पाऊस पडल्यास सर्वत्र पेरणी सुरू होते व यावर्षी खरीप पेरणी लवकरच संपण्याचा अंदाज आहे़---आदमपूर परिसरात मुसळधार पाऊसआदमपूर : आदमपूर परिसरातील खतगाव, आदमपूर, मुतन्याळ, मिनकी, थंडीसावळी, गळेगाव या गावांत रात्री दोन वाजल्यापासून वारे वादळीसह मुसळधार पाऊस झाला. रात्रभर वीज खंडित होती़---जनजीवन विस्कळीतनिवघाबाजार : परिसरातील गाव तलावात पाणी भरले आहे़ तर ओढ्यांना पूर आल्याने अनेकांच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसान झाले. पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. परिसरातील शिरड, पेवा, मनुला, माटाळा, येळंब, कोहळी, साप्ती, तळणी, कोळी, मरडगा, चक्री, उंचेगाव (बु), वाकी, इरापूर, आमगव्हाण, शिऊर, ऊमरी, भाटेगाव, हस्तरा, बोरगाव, वरुला शिवरात दमदार पाऊस झाला़---ट्रॅक्टरचा व्यवसाय ठप्प-परिसरातील शेतकरी आता यांत्रिक शेती करीत असल्याने बैलजोडीचे प्रमाण कमी झाले़ यामुळे शेतकरी सर्रास शेती मशागत पेरणीसह ट्रॅक्टरने करीत होते़ परंतु, संततधार पाऊस पडत असल्याने ट्रॅक्टरचा व्यवसाय ठप्प झाला आहे़
सीता कोपली; पैनगंगा ओसरू लागली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:04 AM
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मागील दोन दिवसांपासून पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पावसाने सीता आणि पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस हिमायतनगर तालुक्यात पडला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही.
ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस