सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जि.प. नांदेड या संस्थेमध्ये सभासद असलेले कै. चंद्रकांत लक्ष्मणराव शेट्टीवार केंद्रीय प्रा.शाखा अटकळी ता. बिलोली यांचे आकस्मित निधन १ फेब्रुवारी रोजी तर कै. संजीव मारोतराव गुट्टे, कें.प्रा.शा. बोळका ता. कंधार यांचे आकस्मित निधन १ ऑगस्ट रोजी, कै. जयराम ब्रम्हाजी डवरे, कें.प्रा.शाखा मनाठा ता. हदगाव यांचे २२ जुलै रोजी आकस्मित निधन झाले होते. त्यांचे वारसदार पत्नी श्रीमती सविता शेट्टीवार पत्ता मु.पो. अर्जापूर ता. बिलोली, श्रीमती मंजुळा गुट्टे पत्ता महालिंगी ता. कंधार, श्रीमती कल्पना डवरे पत्ता मु.पो. जिजाऊनगर, दीपकनगरजवळ, मुंजाजीनगर तरोडा बु. ता.जि. नांदेड यांना पतसंस्थेकडून सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत सुरक्षा कवच अनुदान प्रत्येकी २ लाख रूपयांचा धनादेश संस्थेतर्फे देण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निळकंठ चोंडे, उपाध्यक्ष बाबूराव फसगले, सचिव मधुकर उन्हाळे, संचालक संजय कोठाळे, अशोक पवळे, दत्तप्रसाद पांडागळे, व्यंकट गंदपवाड, सौ. जयश्री भरडे, जीवनराव वडजे, बाबूराव कैलासे, शंकर इंगळे, प्रल्हाद राठोड, विजय पल्लेवाड, चंद्रकांत दामेकर, चंद्रकांत मेकाले, सौ. सुमन डांगे व सभासद बांधव यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
तसेच याप्रसंगी पतसंस्थेच्या या उपक्रमाची दखल घेऊन शोभा दिगांबरराव कुरे यांनी पतसंस्थेमध्ये ४ लाख रूपयांची मुदती ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यावर अध्यक्ष व सचिवांनी सभासदांच्या विश्वासावर पतसंस्था मागेल त्या सभासदास कर्ज वाटप करीत आहे व मयत सभासदांच्या वारसास प्रत्येकी २ लाख रूपये सुरक्षा कवच योजनेच्या माध्यमातून देत आहे. तसेच दोन वर्षापूर्वी ही योजना मोठे उद्दिष्ट समोर ठेवून अंमलात आणली, त्यामुळे आतापर्यंत २० पेक्षा अधिक मयत सभासदांना याचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे सभासदांचा पतपेढीवरील विश्वासात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.