लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुसुचित जाती निवासी शाळेतील ३३ विद्यार्थीनींना बुधवारी जेवणातून विषबाधा झाली. या विद्यार्थीनीवर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बुधवारी रात्री आणखी १२ मुलींना मळमळ होत असल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सहा विद्यार्थींनींना त्रास वाढल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहेमाहुर शहरात सामाजिक न्याय विभागाची अनुसूचित जाती निवासी शाळा आहे. इयत्ता सहावी ते दहावी या वर्गात शिक्षण घेणाºया ३३ विद्यार्थीनींना बुधवारी सकाळी पोळी, पत्ता कोबी, भाजी वरण असे जेवण देण्यात आले होते. मात्र दुपारी बाराच्या सुमारास या विद्यार्थिंनींना चक्कर, डोके दुखी, मळमळ या सारखा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शाळेतील कर्मचारी शिक्षकांनी ३३ विद्यार्थीनींना ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या विद्यार्थीनीवर उपचार सुरु असतानाच रात्री १० च्या सुमारास आणखी बारा विद्यार्थीनींना असाच त्रास सुरु झाल्याने त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल. यातील वेदिका राऊत, सृष्टी पाटील, प्रगती कंटेश्वर, स्वाती भरणे, दिव्या राउत, प्रेरणा वाघमारे या सहा विद्यार्थीनींना १०८ रुग्णवाहिकेद्वारे पालक व शिक्षकांच्या निगरानीत यवतमाळ येथिल शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आह. ४५ पैकी २० विद्यार्थीनींना उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे. तर १९ विद्यार्थीनीवर ग्रामीण रुग्णालयात डॉ. व्ही एन. भोसले, डॉ. तोटावार, डॉ वाघमारे, डॉ एस. बी़ भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी रुग्णालयात जावून विद्यार्थीनींच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसेच शाळेतील स्वच्छता, स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, निवासी कक्ष तसेच वर्ग खोल्यांची तपासणी केली.
माहूर येथील सहा विद्यार्थिनींना यवतमाळ येथे हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 12:14 AM
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुसुचित जाती निवासी शाळेतील ३३ विद्यार्थीनींना बुधवारी जेवणातून विषबाधा झाली. या विद्यार्थीनीवर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बुधवारी रात्री आणखी १२ मुलींना मळमळ होत असल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सहा विद्यार्थींनींना त्रास वाढल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे
ठळक मुद्देविषबाधा : १९ मुलींवर उपचार, २० जणींना उपचारानंतर सुटी