मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:31 AM2019-05-25T00:31:44+5:302019-05-25T00:35:18+5:30

मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.

The smell of struggle in the soil of the manyad | मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

Next
ठळक मुद्देमन्याड खोऱ्याने दिले दोन खासदारकेशवराव धोंडगेंनंतर प्रताप चिखलीकर

गंगाधर तोगरे।
कंधार : मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, दोघांनीही कॉग्रेसच्या मातब्बर पुढाऱ्यांना पराभूत करण्याची किमया साधली.
कंधार तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक संवर्धनाचा समृद्ध वारसा आहे. तसेच राजकीय संघर्षाने मन्याड खोरे सतत चर्चेत राहत आले आहे. भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी शेकापच्या माध्यमातून कॉग्रेस पक्षाविरोधात सतत संघर्ष केला. मन्याड खोºयात शेकापची मजबूत पकड निर्माण केली. त्यांना भाई गुरूनाथराव कुरुडे यांची साथ लाभली. त्यामुळे केशवरावांनी तीन दशके विधानसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केले. तत्कालीन मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्यासोबत ते राजकीय संघर्ष करत राहिले. १९७७ ला केशवराव धोंडगे यांना नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली.
तुटपुंजी राजकीय रसद, प्रचाराची अपुरी साधने, वाहनांची वाणवा राहिली. परंतु कार्यकर्ते मात्र स्वखर्चाने पायाला भिंगरी बांधल्यासमान केशवरावांना विजयी करण्यासाठी फिरले. आणि केशवराव कॉग्रेस उमेदवाराविरोधात प्रचंड मतांनी विजयी झाले. हा कंधार तालुक्याला पहिला खासदार व लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान धोंडगे यांच्यामुळे मिळाला. चार दशकानंतर प्रताप पा. चिखलीकर यांच्या रुपाने २०१९ ला दुसºयांदा तालुक्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली.
प्रताप पा. चिखलीकर यांची राजकीय जडणघडण कॉग्रेस पक्षात सुरूवातीच्या काळात झाली. गावचे सरपंच ते बारूळ, पेठवडज, कलंबर जि.प. सर्कलमधून विजयी होत राजकीय सत्तेत दमदार प्रवेश करत आपली धाडसी नेता अशी ओळख निर्माण केली. कॉग्रेसला बळकट करत असताना विधानसभेची उमेदवारी मागितली. परंतु उमेदवारी नाकारली तरी पक्षाचा आदेश मानत पक्ष उमेदवाराचा प्रचार केला. पुन्हा २००४ साली पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आणि विजयी होऊन राजकीय क्षमता सिद्ध केली.
प्रताप पा.चिखलीकर हे एक अजब राजकीय रसायन आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहत काम करत राहिले. तरीही पक्षाने अन्याय केला तर काहीकाळ सहन करायचा.परंतु सतत अन्याय होत राहिला तर समर्थक, कार्यकर्ते यांच्याशी विचारविमर्श करत राजकीय निर्णय घ्यायचा. अशी अफलातून खुबी त्यांची राहत आली. शिवसेनेविरोधात राजकीय मतभेद झाले आणि भाजपाशी राजकीय सलगी वाढवत पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री केली आणि धाडशी निर्णय घेत एकेकाळी असलेल्या मित्राविरोधात लोकसभा निवडणूक रिंगणात उडी घेतली. जिल्ह्यात राजकीय जाळे भक्कम असलेल्या व मॅनेजमेंट गुरू असलेल्या अशोकराव चव्हाण यांचा राजकीय चक्रव्यूह भेदण्याची किमया साधली. राजकीय संघर्ष मन्याड खोºयातला सतत चर्चेत असतो. त्यावर मात करत यशस्वी होणे ही या भागातील नेत्यांची विशेषत: आहे. तालुक्याने लोकसभेत मोठ्या संघर्षाने दोनदा संधी मिळवली. म्हणून मन्याड खोºयाला राजकीय संघर्षाचा गंध आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
विलासरावांच्या जवळीकतेमुळे तिकीट कापले
निवडून आल्यानंतर कॉग्रेस-रा.कॉ. आघाडी सरकारला पाठिंबा दिला. कंधार-लोहा तालुक्याचा विकास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्याशी जवळीक साधली. परंतु याची मोठी राजकीय किंमत त्यांना पुन्हा २००९ साली कॉग्रेसने उमेदवारी नाकारल्याने चुकवावी लागली.
तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चिखलीकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी कोणतीच कसर ठेवली नाही. चिखलीकर पराभूत झाले तरीही ते नव्या उमेदीने कार्यकर्त्याशी, जनतेशी कधी नाळ तुटू दिली नाही.
२०१४ साली विधानसभा निवडणुकीत हाती धनुष्यबाण घेत झंझावात निर्माण केला. मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली तरीही चिखलीकरांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला.

Web Title: The smell of struggle in the soil of the manyad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.