मिसरूड न फुटलेले झाले अट्टल चोर
गेल्या काही दिवसात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. हाताला काम नसल्यामुळे त्यातील काही जण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातही मिसरूड न फुटलेल्या मुलांचा अधिक भरणा आहे. मौजमजा करण्यासाठी चांगल्या घरातील मुलेही चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे करीत आहेत. परंतु हे आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्यावर कुणाचा संशयही जात नाही. त्यामुळे अशा आरोपींना पकडण्याचे पाेलिसांसमोर आव्हान आहे.
चोरट्यांच्या शोधासाठी पथके नियुक्त
शहरात सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यात आले. परंतु हे चोरटे मोठी टोळी न करता दोघे किंवा तिघे मिळून चोऱ्या करतात. त्यातही अनेक चोरटे हे पोलिसांच्या रेकॉर्डवर नाहीत. नव्यानेच काही जण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क कामी येते. त्याचबरोबर पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.
पोनि. द्वारकादास चिखलीकर, स्थागुशा