इफेड्रीन साठा प्रकरण : मालमत्तेचा शोध सुरु
ऑनलाइन लोकमत -
सोलापूर, दि. 6 - देश-विदेशात गाजत असलेल्या सोलापुरातील इफेड्रीन साठा प्रकरणातील आरोपी मनोज जैन हा 11 कंपन्यांचा संचालक आहे. त्याच्या मालमत्तेचा शोध घेण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी मनोज जैन याच्यासह कंपनीच्या काही व्यवस्थापकाची शुक्रवारी दिवसभर चौकशी केली. कंपनीचे संचालक अजित कामत, राजेंद्र्र कैमल, मनोज जैन, सुनील चित्तोडा, कोमल सुशील तिबरेवाले, जिनत सईद पठाण यांचा कंपनीत काय रोल आहे आदी बाबींची माहिती घेण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सांगितले. सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. कंपनीतून ठाणे पोलिसांनी २३ टन इफेड्रीन जप्त केले आहे. जप्त केलेल्या इफेड्रीनचे नुमने त्यांनी केमिकल विभागाला तपासण्यासाठी दिले आहेत. त्या विभागाचा अहवाल आल्यानंतर न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले आहे.