नांदेड : विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यालय निरीक्षक आणि सफाई कामगारांवर अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी नगरपंचायत कार्यालयातील कार्यालय निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५०० रुपये शासकीय शुल्क आणि ५०० रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली. शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. यावेळी कार्यालय निरीक्षक हराळे यांच्या मार्फतीने सफाई कामगार बालाजी चांदू पाटोळे यांनी तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारली.
यावेळी लाचलुचपत पथकाने पाटोळे याला पकडले. या प्रकरणात कार्यालय निरीक्षक बालाजी हराळे आणि सफाई कामगार बालाजी पाटोळे या दोघांच्या विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.