यामुळे सरळ वानाच्या सोयाबीन बॅगचे दर तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच संशोधित बियाणांचा दर यापेक्षाही जास्त आहे. खासगी कंपन्यांच्या सोयाबीन दरावर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे. कपाशी बियाणाप्रमाणे सोयाबीन बॅगच्या एमआरपीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.
खासगी कंपन्यांकडून नफेखोरी
खासगी तसेच बियाणे महामंडळाकडून शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या प्रक्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम घेतात. यंदा सोयाबीन बाजारात आले तेव्हा चार हजार ते साडेचार हजार रुपये दर होते. या दरांच्या वीस ते पंचवीस टक्के अधिकचे दर बियाणे उत्पादकांना दिला जातो. यामुळे पाच ते साडेपाच हजार रुपये दराने खरेदी केलेले सोयाबीन खासगी कंपन्या १० हजार ते १३ हजार रुपये दराने बियाणांच्या माध्यमातून विक्री करत आहेत. परंतु, बियाणे महामंडळाचे दर प्रतिकिलो ७५ रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याने ते नियंत्रणात आहेत. परंतु, यंदा मागणीच्या केवळ तीस टक्केच बियाणे उपलब्ध झाले आहेत.
चौकट
बाजारात खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणाचा दर आभाळाला पोहोचला आहे. विक्रेते एमआरपीवर बॅगा विक्री करत आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन एमआरपीवर नियंत्रण आणावे.- नवनाथ वारकड, शेतकरी, संगुचीवाडी ता. कंधार