गोविंद टेकाळे/ युनूस नदाफ
अर्धापूर/पार्डी (जि़नांदेड) : पंधरा दिवसांअगोदर पिकाची अवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी होती. दृष्ट लागावी, असे पीक होते़ परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावून पिकांचे वाटोळे केले. पंधरा दिवसांअगोदर काय होते? आता काय होऊन बसले अशी दशा आहे. सोयाबीन, कापूस, फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हळदीवर बुरशीसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला़ शेतकºयांना खरीप हंगामातील पिकापासून फार मोठी आशा होती़ पिकेही जोमात होती़ खरीप हंगामातील पिकांपासून चार पैसे पदरात पडतील, या पैशातून डोक्यावरील कर्ज कमी होईल, याच पैशातून रबी हंगामातील पिकांसाठी बी- बियाणे खरेदी करता येईल, अशी आशा बाळगून शेतकरी खरिपाची कापणी करीत होता़ परंतु परतीच्या पावसाने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले़ आता कोणत्या पिकाच्या सा'ाने जगावे, हा मोठा प्रश्न बळीराजासमोर आहे.
अर्धापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन कापूस, उडीद, मूग व ज्वारी २६००१ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील़ तालुका कृषी विभागाने सादर केलेल्या नुकसानाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात ५६ गावे व एकूण २८००० शेतकरी आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र २८२७० हेक्टर आहे. त्यापैकी २६००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. आतापर्यंत १३५०० शेतकºयांचे अर्ज जमा झाले आहेत .अर्धापूर तालुक्यातील दाभडयेथील आत्माराम टेकाळे यांच्याकडे पाच एकर जमीन असून चारएकर जमिनीवर सोयाबीनची पेरणी होती़ सोयाबीनची कापणी सुरू असतानाच पावसाने हाहाकार माजविला़पीकनिहाय एकूण क्षेत्र व बाधित क्षेत्रसोयाबीन - १७४६३ बाधित १५८४३, कापूस १६७३ बाधित १५०५ व इतर ८० बाधित ८०थेंबाथेंबाने जगविलेल्या द्राक्षबागांचा पाऊस झाला वैरीदत्ता पाटील।तासगाव (जि.सांगली) : तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरात तीन-चार वर्षांपासून पाऊस नसल्याने दुष्काळाच्या दाहकतेत द्राक्षबागा जगवण्यासाठी टँकरने पाणी घातले. लाखो रुपये खर्च करून पीक छाटणी घेतली. फुटव्यातून दिसणाºया द्राक्षांच्या घडांसोबत, कर्जमुक्तीच्या आशेचा किरण दिसू लागला. मात्र परतीच्या पावसाने थैमान घातल्याने घड कुजून गेले. द्राक्षबागांसाठी दुष्काळी पट्ट्यात पाऊसच वैरी झाला.सावळज गावचे एकूण क्षेत्र ३ हजार १७८ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे सातशे हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. सावळजच्या यशवंत पोळ यांची दहा एकर द्राक्षबाग आहे. उन्हाळ्यात बाग जतन करण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी घातले. त्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केले. सप्टेंबरमध्ये दोन टप्प्यात केलेल्या छाटणीनंतर फुटलेल्या घडांना परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने द्राक्षफळांची कूज झाली. खते, औषधांसाठी जवळपास आठ ते दहा लाख रुपये खर्च केले होते, तेही वाया गेले. या क्षेत्रातून अपेक्षित ३० लाखांचे उत्पन्नही वाया गेले. सावळजच्या प्रत्येक द्राक्ष बागायतदाराची पोळसारखीच अवस्था आहे. अद्याप बागांमध्ये पाणी आहे. त्यामुळे मुळ्या कुजण्याची भीती आहे.पंचनाम्यात नुकसानदिसणार कसे?छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांचे पंचनामे सुरु आहेत. अद्यापही छाटणी न झालेल्या बागांनाही या पावसाचा फटका बसणार आहे. पाऊस जास्त झाल्याने अनेक बागांतून अद्यापही पाणी आहे. त्यामुळे बागांच्या मुळ्यांची वाढ थांबली आहे. शिवाय त्या कुजण्याची भीती आहे. त्यामुळे या नुकसानीचे गणित कशातच होणार नसल्याची खंत शेतकºयांत आहे.