सिडको हडको परिसरासह वाघाळा, असदवन आदी भागातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते नाल्या स्मशानभूमीची पाहणी महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, स्थायी सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्यासह अभियंता गिरीष कदम, माजी सभापती अमित तेहरा, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे आदींनी केली. या पाहणीनंतर लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
अनेक वर्षांपासून सिडको हडको परिसरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने व असदवन वाघाळा भागासह अनेक भागात नाल्या स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत होते. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार मनपा प्रशासनाच्या वतीने महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी सभापती अमित तेहरा, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, किशन कल्याणकर, अभियंता गिरीष कदम यांनी मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते, नाल्या, स्मशानभूमीची पाहणी केली. वाघाळा, असदवन, शाहूनगर भागात नाल्या रस्ते पाहणी केली. विकासात्मक लवकरच कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगून प्रलंबित कामे लवकरच चालू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दक्षिण भागातील सिडको हडको परिसरात रस्ते नाल्या स्मशानभूमी ही लवकरच सुरू होणार असल्याचे समजते.