लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी सुट्यांनिमित्त राज्यात जादा ४६६ तर औरंगाबाद प्रदेशात ९५ बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे़ परंतु, नांदेड विभागात केवळ ९ बसेस सोडल्या जाणार आहेत़ तर रेल्वे प्रशासनाने एकही विशेष गाडी सोडण्याचे नियोजन केले नसल्याने चाकरमान्यांचा दिवाळीतील प्रवास खडतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही़दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील लिंबगाव ते माळटेकडी स्थानकादरम्यान सिग्नलिंगची व्यवस्था, माळटेकडी ते मुगट दुहेरीकरण यासह नांदेड ते लिंबगाव दुहेरीकरणाचा वापर करता यावा, यासाठी विविध प्रकारच्या दुरूस्ती, देखभाल आणि पटरी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यासाठी नांदेड विभागाच्या वतीने आजपर्यंत दोनवेळा लाईन ब्लॉक जाहीर केला असून १८ आॅक्टोबरपर्यंतच्या रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे़ यादरम्यान शंभराहून अधिक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ तर अनेक गाड्या रद्द झाल्या़ यामध्ये तिरूपती एक्स्प्रेसचादेखील समावेश आहे़ ऐन दसऱ्यामध्ये तिरूपतीची गाडी रद्द झाल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणारा ट्राफिक ब्लॉक लक्षात घेवून एसटी महामंडळाने औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि मुंबईसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करणे गरजेचे होते़ परंतु, एसटीकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याने खासगी वाहनधारकांची चांदी होत आहे़दसºयानंतर दिवाळीची लगबग सुरू होते़ दिवाळीच्या सुट्यांमध्ये स्वत:च्या गावी तसेच इच्छितस्थळी, पर्यटनाचे नियोजन करणाºयांची संख्या मोठी आहे़ मात्र, नांदेड विभागातून धावणाºया रेल्वे गाड्यांवर असाच लाईन ब्लॉकचा परिणाम झाला अथवा ऐनवेळी गाड्या रद्द होतील, असा विचार करून बहुतांश चाकरमान्यांकडून खासगी वाहतुकीला पसंती दिली जात आहे़ त्यातच एसटी महामंडळाने नांदेड विभागात केवळ ९ बस सोडण्याचे नियोजन केले आहे़ यामध्ये नांदेड येथून पुण्यासाठी दोन बस, सोलापूरसाठी २ आणि नांदेड-चंद्रपूर, भोकर - अक्कलकोट, मुखेड - शिंगणापूर, देगलूर- नागपूर या मार्गावर प्रत्येकी एक अशा एकूण ९ बसेसचे नियोजन आहे़ पंधरा दिवसानंतर दिवाळीत जादा गाड्या सोडण्याचे नियोजन असून १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी जादा गाड्या धावतील़ नांदेड विभागातून पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, शेगाव आदी शहरांसाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे़ परंतु, आजपर्यंत त्याप्रकारचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आलेले नाही़ऐन दिवाळीत जादा बसेस सोडल्यास प्रवाशांना आरक्षण, प्रवासाचे नियोजन करणे कठीण होईल़ त्यामुळे नांदेड विभागाकडून जादा बसेस सोडण्यात येणार असतील तर त्याचे नियोजन आठ दिवसांत होणे गरजेचे आहे़ रेल्वे प्रशासनाने नांदेड विभागातून पुणे, मुंबई, नागपूर रेल्वेचे नियोजन करणे गरजेचे आहे़फलाट क्रमांक चार रेल्वेसाठी बंदनॉन-इंटर लॉक वर्किं गचे काम तसेच दुहेरीकरण आणि इतर कामासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने १४ आॅक्टोबरपासून फलाट क्रमांक चार बंद करण्यात आला आहे़ त्यामुळे या फलाटावरून धावणा-या सर्व गाड्या इतर म्हणजेच नांदेड स्थानकातील १, २ अथवा ३ क्रमांकांच्या फलाटावरून धावतील, असे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे़ तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ याचा फटका प्रवाशांना सोसावा लागेल़ दरम्यान, १७ आॅक्टोबरपर्यंत नांदेड स्थानकातील काम पूर्ण होवून १८ आॅक्टोबरपासून फलाट क्रमांक चार रेल्वेगाड्यांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली़
विशेष रेल्वेची प्रतीक्षा; विभागात केवळ ९ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:38 AM