शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

प्रशासकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:58 AM

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. राजकीय तोफा थंडावल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी नांदेड मतदारसंघात जवळपास २ हजार ४३० मतदान केंद्रावर ११ हजार १५५ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी रवाना होणार आहेत.

ठळक मुद्देप्रचार थांबला ११ हजार कर्मचारी नियुक्त‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर

नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. राजकीय तोफा थंडावल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी नांदेड मतदारसंघात जवळपास २ हजार ४३० मतदान केंद्रावर ११ हजार १५५ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी रवाना होणार आहेत.नांदेड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे २९ मार्च रोजी नांदेड मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात राहिले. या उमेदवारांनी १ एप्रिलपासून प्रचाराला सुरुवात केली. जवळपास १५ दिवस राजकीय पक्षांच्या तोफा धडाडल्या. अपक्षांनीही आप-आपल्या परिने आपला प्रचार केला. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबला. १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार २२८ मतदान केंद्रे तसेच २०३ सहायक मतदान केंदे्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येकी एका मतदान केंद्रावर ४ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी राहणार आहेत.मतदान प्रक्रियेसाठी पथके बुधवारी सकाळपासूनच रवाना होण्यास प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. नांदेड लोकसभा मतदार संघात येणाºया सहा विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांची अदलाबदल प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे कर्मचारी बुधवारी आपआपल्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. या कर्मचाºयांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रातिनिधिक स्वरूपातील मतदान केंद्राची स्थापना करुन ईव्हीएम हाताळणी, व्हीव्हीपॅट मशिनची माहिती देण्यात आली आहे. एकूण मतदान प्रक्रियेसाठी अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले आहेत.दरम्यान, निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप कक्षाच्या वतीने ‘चुनावी पाठशाला’ उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. वर्षभर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. महिला, दिव्यांग मतदारांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथमच मतदान करणाºया महाविद्यालयीन तरुणांसाठी मतदान क्लबही उभारण्यात आले.महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मोटारसायकल रॅली, पदयात्रा, बॅनर्स, प्रातिनिधिक स्वरूपातील मतदान प्रक्रियेची माहिती आदी बाबींद्वारे जनजागृती करण्यात आल्याचे स्वीप पक्षाचे प्रमुख प्रशांत डिग्रसकर यांनी सांगितले.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांतून मतदानाचा टक्का निश्चित वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.२८८ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेºयांची नजरनांदेड लोकसभा मतदारसंघात असलेल्या ४७ संवेदनशील मतदान केंद्रांसह २८८ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर राहणार आहेत. नांदेड मतदारसंघात ४७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्याचवेळी एकूण २८८ केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेबकास्टींगद्वारे थेट निवडणूक आयोगही या मतदान केंद्रावरील हालचालीची नोंद घेवू शकणार आहे. एकूणच नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या सुरक्षेबाबत तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.उमेदवारांची बैठकलोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी थंडावली. ही रणधुमाळी थंडावताच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड मतदारसंघातील उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीस काही उमेदवारांसह उमेदवारांचे प्रतिनिधी हजर राहिले. या बैठकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना ईव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅटबाबत माहिती देण्यात आली. तसेच ईव्हीएम मशिनच्या हालचालीबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग