शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
2
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
3
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
4
Jamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
10
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
12
Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी
13
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे
15
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
18
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
19
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
20
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

नांदेड येथे योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:52 AM

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही गुरुवारी ही अनुभूती घेतली. योगासाठी शाळा-महाविद्यालयाच्या मैदानासह इतरत्र पहाटेपासूनच गर्दी दिसत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जावे असे प्रत्येकास वाटते. मात्र स्पर्धेच्या युगात ते शक्य होत नाही. परंतु आपल्याला हवी असलेली शांती आपल्यामध्येच वसलेली आहे. हे फार थोड्या लोकांना कळते. फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही गुरुवारी ही अनुभूती घेतली. योगासाठी शाळा-महाविद्यालयाच्या मैदानासह इतरत्र पहाटेपासूनच गर्दी दिसत होती.जिल्हा प्रशासन व आंतरराष्ट्रीय योग दिन समिती नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नेहरु युवा केंद्र, जिल्हा स्काऊट गाईड व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन श्री गुरुग्रंथ साहिब भवन, गुरुद्वारा परिसर नांदेड येथे करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील अंदाजे पाचशे खेळाडू मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक, महिला, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस पतंजलीचे योग प्रशिक्षण आनंददेवजी महाराज, हरिद्वार मुळ प्रयाग अलाहाबाद यांचे स्वागत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अशोक देवकरे, नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे डी.पी. सिंघ, गुरुविंदरसिंघ वाधवा, शिवाजी शिंदे, पतंजली योग समितीचे साजणे, पी.डी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात स्वामी आनंददेवजी महाराज यांनी उपस्थितांना योगासन, प्राणायाम, ध्यानचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व उपस्थितांकडून करुन घेतले. सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार दिगंबर करंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, धम्मानंद कांबळे, विद्यानंद भालेराव आदींनी परिश्रम घेतले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही योग दिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.दरम्यान जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातही पहाटेपासूनच योगासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गर्दी केली होती. याबरोबरच विविध शासकीय कार्यालयांचा परिसरही योग दिवसानिमित्ताने पहाटेपासूनच गजबजलेला होता.----कुलगुरू : योगसाधना उन्नत बनवितेमनच शरीराला कार्य करायला लावते. मनावर आपला ताबा नसेल तर समाजामध्ये स्वास्थ असणार नाही. म्हणून आज योगाची मोठी गरज आहे. योग साधना मानवी जीवनाला उन्नत बनविते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. विद्यापीठात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ. संध्या विद्यासागर, प्र. कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी संध्या विद्यासागर यांनी ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या ग्रंथातील योग दिन सादर केले. शिबिरासाठी योगाचार्य रामचंद्र गरड व शिवमूर्ती भातांब्रे यांना निमंत्रित करण्यात आले होते. सुत्रसंचलन डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड