बिलोली : उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी मारल्याने १४ प्रवासी जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली आहे.
बिलोली अगाराची बस क्रं. MH 20 BL1903 ही उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी.अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले असून, उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पो.नि. विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये अनुक्रमे केराबाई ढगे (चिरली ४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव ३२), मोहन मोरकर (चिरली ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव ११), रमा कैवारे (चिरली ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली ५०), सविता राठोड (जारीकोट २७), हाजरा पठाण (पिंपळगाव ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट ६०), अनुसया स्वामी (जारीकोट ६०), पार्वती स्वामी ५५) यांचा समावेश आहे.
बिलोली, कुंडलवाडी, उमरीहून रावधानोरा मार्ग बिलोलीला येणारी बस अरुंद रस्ता आणि वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचाराला नांदेड येथे हलविले आहे, अशी माहिती आगार प्रमुख सुभाष पवार यांनी दिली.
बिलोली अगाराची बस क्रं. एमएच २० बीएल १९०३ ही उमरीहून रावधानोरा मार्गे बिलोलीला येत असताना कुंडलवाडीपासून ३ कि. मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव जवळील गणपती जवळ हा अपघात झाला. अरुंद रस्ता असल्यामुळे चालक राजू इरलेवाड यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी मारली. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशांना मार लागला असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. उर्वरित १२ जखमींवर बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय व कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अपघाताची बातमी समजताच कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित कसले व आगार प्रमुख सुभाष पवार हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त बसमधून जखमी प्रवाशांना पिंपळगाव, चिरली, टाकळी येथील ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये केराबाई ढगे (चिरली वय-४५), उत्तम गंगापूर (ब्राह्मणगाव, ७५), सरस्वती भास्करे (कुंडलवाडी, ६०), भूमनबाई सोनकांबळे (पिंपळगाव, ६०), भारतबाई गायकवाड (लोहगाव, ३२), मोहन मोरकर (चिरली, ६५), प्रणाली गायकवाड (लोहगाव, ११), रमा कैवारे (चिरली, ३२), सुंदरबाई कैवारे (चिरली, ५०), सविता राठोड (जारीकोट, २७), हाजरा पठाण (पिंपळगाव, ४५), संभाजी वाघमारे (जारीकोट, ६०), अनुसया स्वामी (जारीकोट, ६०), पार्वती स्वामी, ५५) यांचा समावेश आहे.
स्टेअरिंग लाॅक झाल्याने घडला अपघात
सदर अपघात हा स्टेअरिंग लाॅक झाल्यामुळे घडला असल्याची माहिती पुढे येत आहे. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ६८ प्रवासी होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली. परंतु, एसटीच्या अधिकाऱ्यांनी केवळ ५० प्रवासी प्रवास करत होते, असे सांगितले आहे.अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी समोरील काचा फोडण्यात आल्याचे चालक राजू भुजंगा इरलेवाड यांनी सांगितले. तसेच बस चालक राजू भुजंगा इरलेवाड यांच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेण्यात आली आहे.