ॲलोपॅथी डॉक्टरांचा बंद
अर्धापूर - केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने ५८ शस्त्रक्रियांना मान्यता दिली. या निर्णयाचे अर्धापुरातील आयुर्वेद डॉक्टरांनी समर्थन केले. गुलाबी फिती लावून रुग्णसेवा केली. तर ॲलोपॅथी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवून या निर्णयाचा विरोध केला. या संपात डॉ.विनोद जाधव, डॉ.शरद चरखा, डॉ.अमीनोद्दीन सिद्दीकी, डॉ.उदयसिंह चौहाण, डॉ.उत्तम इंगळे, प्रसाद वानखेडे, डॉ.इनामदार, डॉ.ओमप्रकाश जडे, डॉ.कौठेकर, डॉ.विशाल लंगडे, डॉ.राजेश राऊत, डॉ.अनिरूद्ध देशमुख, डॉ.गजानन हाके आदी डॉक्टरांनी सहभाग घेतला.
गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
कुंडलवाडी - येथील मुंडे चौकात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शेख जावेद, सायारेड्डी पुपलवार, नगरसेवक गंगाप्रसाद गंगोने, सचिन कोटलवार, हणमंत इरलावार, सुनील मलकुवार, दत्तू कापकर, गणेश गुरुपवार, श्याम माहेवार, साईनाथ माहेवार, संतोष करपे, साई भोरे आदी उपस्थित होते.
रस्त्याचे काम रखडले
नायगाव बाजार - मांजरम ते दरेगाव रस्त्याचे काम रखडल्याने गैरसोय होत आहे. सुरुवातीला जोमाने काम सुरू झाले होते. आता मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर टाकलेली गिट्टी पूर्णपणे उखडली. ही बाब वाहन धारकांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. याशिवाय नागरिकांनाही त्रास होत आहे.
सतत वीज खंडित
हदगाव - तालुक्यातील उंचेगाव परिसरातील आमगव्हाण, इरापूर, उंचेगाव, शिऊर, वाकी आदी गावे तळणी येथील ३३ केव्ही उपकेंद्रास जोडण्यात आली. मात्र सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी लोकांच्या आहेत. शेतीसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा होतो. वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.
अवैध व्यवसाय वाढले
कुरुळा - कुरुळा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढल्याच्या तक्रारी आहेत. पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मटका, गुटखा, विनापरवाना देशी दारू विक्री जोरात सुरू आहे. पोलीस याकडे बघ्याची भूूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. आता पोलीस अधीक्षकांनीच याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरीत आहे.
सपोनि पठाण यांचा सत्कार
नायगाव - कुंटूर पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलल्याबद्दल सपोनि एच.के. पठाण यांचा प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी सत्कार केला. पठाण यांनी वर्षभराच्या काळात ठाण्याच्या इमारतीमध्ये बरेच बदल घडवून आणले. कर्मचाऱ्यांनाही चांगल्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या.
घरगुती गॅसचा वापर
बिलोली - तालुक्यातील लोहगाव परिसरातील हॉटेल, धाबा, खाणावळीत घरगुती गॅसचा वापर सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. लोहगाव, नरसी, रामतीर्थ, राहेर परिसरात हा प्रकार दिसून येतो. गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याने सर्वसामान्यांना घरगुती गॅस मिळणे अवघड झाले.
शंकरनगर बंद
बिलोली - बिलोलीतील घटनेच्या निषेधार्थ १२ डिसेंबर रोजी शंकरनगर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. रास्ता रोकोही पाळण्यात आला. यावेळी लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, नितीन तलवारे, भास्कर भेदेकर, अंकुश वाघमारे, सचिन वाघमारे, गंगाधर कांबळे, शेख गऊस, लक्ष्मण पाटील, दत्ता पाटील, संतोष पुयड, प्रकाश घनसांगडे, डी.जी.बनसोडे, रावसाहेब बनसोडे आदी उपस्थित होते.
दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध
मुदखेड - शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा मुदखेडात निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख संजय कुरे, सचिन वाने, सचिन चंद्रे, बाजार समितीचे सभापती म्हैसाजी भांगे, संचालक सुरेश शेटे, गोविंदराव शिंदे, साहेबराव चव्हाण, अंकुश मामीडवार आदी उपस्थित होते.