लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड ते अमृतसर विमानसेवा सुरु करण्यास एअर इंडियाने अनुकूलता दर्शविल्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला.़ अमृतसर येथून निघालेले विमान (एटीक्यू-एआय ८१५) शनिवारी दुपारी १़ १० वाजता नांदेड विमानतळावर लँड झाले़ या सेवेचा लाभ घेत पहिल्याच फ्लाईटने नांदेडला दाखल झालेल्या १७० प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.़ दरम्यान, परतीच्या प्रवासात नांदेड येथून फ्लाईट क्रमांक एनडीसी-एआय ८१६ दुपारी १़ ५० मिनिटांनी ८० प्रवाशांना घेवून अमृतसरकडे रवाना झाले़अमृतसर ते नांदेड हा प्रवास अन्य माध्यमाने करायचा झाल्यास ३५ ते ४० तास लागत होते़ या दोन ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या शहरांना जोडण्यासाठी एअर इंडियाने विमानसेवा सुरु केल्याने हे अंतर केवळ सव्वादोन तासांत पार करणे शक्य झाले आहे.़ अमृतसर विमानतळावरुन शनिवारी सकाळी १०़ ५० मिनिटांनी टेक आॅफ करुन नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी १़ १० म्हणजेच २ तास २० मिनिटांत दाखल झाल्याची माहिती वैमानिक कॅ़ पंकज शर्मा यांनी दिली़ यावेळी कॅ़ जाफर ठाकूर, कॅ़ डी़ एस़ गील उपस्थित होते.शीख बांधवांसाठी दक्षिण काशी म्हणून नांदेडची ओळख जगाच्या नकाशावर आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविक नांदेडला भेट देतात. तसेच अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांची संख्या मोठी आहे. या दोन्ही क्षेत्रांना जोडणारी विमानसेवा सुरु करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती़अमृतसर - नांदेड विमान सेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले.महापौर शीला भवरे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, नगरसेवक किशोर स्वामी, नगरसेविका जयश्री पावडे यांच्यासह गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाºयांनी अमृतसर येथून आलेल्या प्रवाशांचे स्वागत केले. यावेळी विमानतळाचे संचालक मनोज पुना यांची उपस्थिती होती.दिल्ली- नांदेड विमानसेवेची मागणीश्री सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी देश -विदेशातून भाविक मोठ्या संख्येने नांदेड शहरात येतात. दिल्ली येथून नांदेडसाठी विमानसेवा सुरू झाल्यास विदेशातील भाविकांना याचा फायदा होईल़ अमृतसरनंतर आता दिल्ली विमानसेवा सुरु करण्यासाठी शासन आणि विमान कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली.दरम्यान, अमृतसर विमानसेवा सुरू झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला़
नांदेड-अमृतसर विमानसेवेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:42 AM
नांदेड : नांदेड ते अमृतसर विमानसेवा सुरु करण्यास एअर इंडियाने अनुकूलता दर्शविल्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला.़ अमृतसर येथून निघालेले विमान (एटीक्यू-एआय ८१५) शनिवारी दुपारी १़ १० वाजता नांदेड विमानतळावर लँड झाले़ या सेवेचा लाभ घेत पहिल्याच फ्लाईटने नांदेडला दाखल झालेल्या १७० प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.़ दरम्यान, परतीच्या प्रवासात नांदेड येथून फ्लाईट क्रमांक एनडीसी-एआय ८१६ दुपारी १़ ५० मिनिटांनी ८० प्रवाशांना घेवून अमृतसरकडे रवाना झाले़
ठळक मुद्देअडीच तासांचा प्रवास : अमृतसर येथून पहिल्या विमानाने आलेल्या १७० प्रवाशांचे नांदेड विमानतळावर केले स्वागत