नांदेड : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारी येथील कुसुम सभागृहात सुरुवात झाली.रंगकर्मी प्रा. रवी श्यामराज यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रामचंद्र शेळके, अ.भा.म.नाट्य परिषद, नांदेडचे कार्यवाह गोविंद जोशी, डॉ. भरत जेठवानी, परीक्षक संजय पेंडसे, गोविंद गोडबोले, धिरज पलसे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंब्रिज विद्यालय, नांदेड यांच्या ‘मिसिंग’ या नाटकाने स्पर्धेला सुरुवात झाली. सूत्रसंचालन, समन्वयक दिनेश कवडे यांनी केले.स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, नागेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘येलीयन्स द ग्रेट’, ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशन इन्स्टिट्यूट, जिंतूरच्या वतीने संतोष नारायणकर लिखित, दिग्दर्शित ‘हे राज्य बदलायलाच हवे’, ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्या वतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित ‘शाळा सुटली पाटी फुटली’ आणि क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने उदय कात्नेश्वरकर लिखित मधुकर उमरीकर दिग्दर्शित ‘कातरवेळ’ या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण झाले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुदाम केंद्रे, अक्षय राठोड, हिमालय रघुवंशी, विनायक निरपणे, निखिल भिसे हे काम पाहत आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रसिकांची गर्दी लक्षणीय होती.
- गुरुवारी तन्मय ग्रुप नांदेडच्या वतीने ‘आज हे बंद उद्या ते बंद’, प्रियदर्शनी मेमोरियल ट्रस्ट, नांदेडच्या वतीने ‘मला लाईक्स पाहिजे’, श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला, सेलू, (जि. परभणी) वतीने ‘क्लोन’, नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णीच्या वतीने ‘बुद्धाची गोष्ट’, राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने ‘कोलंबस’, सिद्धेश्वर विद्यालय, जिंतूरच्या वतीने ‘मुखवटे’, वेलिंग्टन विद्यालय, नांदेडच्या वतीने ‘जाईच्या कळ्या’ या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.