नांदेड : दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी या यात्रेला देवस्वारीने सुरुवात होईल. त्यानंतर ५ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने माळेगावमध्ये दाखल झाले असून जनावरांचा व्यापारही सुरू झाला आहे.पाच दिवस चालणाऱ्या माळेगाव यात्रेचे नियोजन जिल्हा परिषद नांदेड, प.स. लोहा व ग्रामपंचायत माळेगाव च्या वतीने करण्यात आलेले आहे. ४ जानेवारी पासून खंडेरायाची शासकीय पूजा करून पालखीच्या आगमनाने माळेगाव यात्रेला येळकोट-येळकोट जय मल्हार च्या गजरात खोबरा-खारीक उधळून यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेमध्ये भारतभरातून व्यापारी व यात्रेकरू लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात.पाच दिवस चालणा-या यात्रेमध्ये ४ जानेवारी रोजी खंडेरायाची शासकीय पूजा, पालखी, भव्य पशुप्रदर्शन, कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात येणार आहेत.भारतात सर्वात मोठा घोडा बाजार, उंटांचा बाजार व गाढवांचा बाजार माळेगाव यात्रेमध्ये भरला जातो. या यात्रेच्या निमित्ताने भारतभरातून उंट, घोडे, गाढव मोठ्या प्रमाणात डेरेदाखल झालेले आहेत. यात्रेमध्ये आनंद नगरी, गंगनबीड आकाशी पाळणे, मौत का कुवाँ, जादूचे खेळ, चादरींचा बाजार, ताडपत्रीचा बाजार, घोड्यांचे साज मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.पशुसंवर्धन विभाग नांदेड व पंचायत समिती, कंधार यांच्या वतीने कंधार येथून श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेपर्यंत पशुसंवर्धन विकास ज्योतीची मिरवणूक ४ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. यावेळी जि.प.अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जि. पशुसंवर्धन उपायुक्त मधुसूदन रत्नपारखे, सभापती सत्यभामा देवकांबळे, उपसभापती भीमराव जायेभाये, जि.प.पशुसंवर्धन सभापती लक्ष्मण रेड्डी, जि.पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांची उपस्थिती राहणार असल्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. शाम खुने यांनी सांगितले़दरम्यान, शुक्रवारीच ग्रामीण महिला व बालकांसाठी दुपारी २ वाजता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याबरोबरच दुपारी अडीच वाजता भव्य कृषि प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन व कृषिनिष्ठ शेतकºयांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.१२० जादा बसगाड्यानांदेड, लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खंडेरायाच्या माळेगाव यात्रेला सुरवात झाली असून एसटी परिवहन महामंडळाकडून १२० बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये नांदेड आगारच्या २५, भोकर - १०, किनवट- दोन, मुखेड- २०, देगलूर - १८, हदगाव -१२ व बिलोली- १२ गाड्यांचा समावेश आहे. जादा बसेसची व्यवस्था १० जानेवारी या दरम्यान केली आहे. कंधार आगाराने २५ बसेस कंधार, लोहा येथून उपलब्ध केल्या आहेत. मागील वर्षी आगाराने २२ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले होते. यावर्षी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे.आज शासकीय पूजामाळेगाव यात्रेची सुरुवात शुक्रवारी सकाळी ११ वाजता शासकीय पूजेने होत आहे. देवस्वारी आणि पालखी पूजन खा. अशोकराव चव्हाण आणि पालकमंत्री रामदास कदम तसेच आ. अमिताताई चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार आहे. यावेळी आ. डी.पी. सावंत, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. प्रदीप नाईक, भाई केशवराव धोंडगे, शंकरअण्णा धोंडगे, रोहिदास चव्हाण, गुरुनाथ कुरुडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या उपस्थितीत होत आहे.माळेगाव यात्रेत तगडा पोलीस बंदोबस्त
- माळाकोळी : माळेगाव यात्रेत कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अकराशे पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये दोन पोलीस उपविभागीय अधिकारी सहा पोलीस निरीक्षक, ६३ पीएसआय, ४७१ पोलीस कर्मचारी, ४५ ट्रॅफिक पोलीस, जलद प्रतिसाद पथक ४६, १०२ महिला कर्मचारी, ४०० होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आल्याची ठाणे प्रभारी सुरेश मांटे यांनी दिली आहे.
- यात्रा प्रभारी म्हणून कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी सरवदे व ठाणे प्रभारी म्हणून माळाकोळीचे सपोनि सुरेश मांटे यांची नियुक्ती केली आहे.
- माळेगाव यात्रेत पोलीस यंत्रणेकडून चिडीमार पथक, छेडछाड पथक, दारूबंदी पथक, गुप्त माहिती पथक, दहशतवाद विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या माध्यमातून संरक्षण दिले जाणार आहे.