यावर्षीचा खरीप पेरणीचा हंगाम १५ दिवसांवर आला असताना, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीत शेतकरी चोहोबाजूंनी पिचलेला असून, त्यात खतांची ही दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे. एका हाताने शेतकऱ्यांना मदत म्हणून ५०० रुपये द्यायचे आणि खत, डिझेल या शेतीउपयोगी वस्तूंच्या किमती वाढवून १००० रुपये त्याच्या खिशातून काढायचे असे दुट्टपी धोरण आता केंद्र सरकारने बंद करावे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांना देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना प्रदेश पदाधिकारी मंगलताई निमकर, डॉ. रेखा पाटील चव्हाण, मंगल धुळेकर, सुमती व्याहाळकर, अनिता हिंगोले, महिला जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अनुजा तेहरा, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डक, तसेच जेसीका शिंदे, शाहीन समदानी, पुनीता रावत, सुनंदा देशमुख, पद्मा झम्पलवाड, सीमा राठोड, जयश्री जैस्वाल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
नांदेड महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:18 AM