अ. भा. किसान सभा व इतर पाचशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या संघनांच्या वतीने राजधानी दिल्लीच्या चारही सीमेवर गेल्या चार महिन्यापासून बेमुद्दत आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्याची देशव्यापी हाक देण्यात आली होती. परंतु नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दहा दिवसांचे लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आंदोलन न करता पाठिंबा देत असल्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या असून जनविरोधी धोरणे घेणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
इंधन व गॅस दरवाढ मागे घेण्यात यावे, कामगार विरोधी पारित केलेले कायदे रद्द करावेत, केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करावेत, वीज विधेयक रद्द करावे आदी मागण्या करण्यात आल्या.
निवेदनावर सीटू नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड,जिल्हा अध्यक्ष कॉ. उज्वला पडलवार,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.शेख मगदूम पाशा,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड,कॉ.सं.ना.राठोड,कॉ.वसंत राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.