अखिल भारतीय किसान सभा व किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने देशव्यापी तसेच महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज वाई बाजार येथे उग्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी सह प्रहार जनशक्ती पक्ष तसेच किसान युवा क्रांती मोर्चाच्या वतीने या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देताना शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात काम करणाऱ्या केंद्र सरकारवर कडाडून टीका करत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.
दरम्यान मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडून तलाठी यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनात कॉ. राजकुमार पडलवार यांच्यासह कॉ. शंकर सिडाम, कॉ.बाबा डाखोरे, कॉ. किशोर पवार, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ.अमोल आडे, गांगजी मेश्राम, संजय मानकर, राजू राठोड, रवी भगत, चंद्रभान निलेवाड यांच्यासह वंचित आघाडीचे नेते व प्रहार नेत्यांची उपस्थिती होती. तर आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी विलास जाधव, सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर व गोपनीय शाखेचे खामनकर, नांदगावे, त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला...