श्रीनिवास भोसले ।नांदेड : स्ट्रॉबेरी म्हटले की डोळ्यांसमोर महाबळेश्वर येते़ परंतु, नांदेड तालुक्यातील प्रयोगशील शेतक-याने महाबळेश्वरच्या धर्तीवर लिंबगाव येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतून विक्रमी उत्पन्न काढण्याची किमया साधली आहे़ हा प्रयोग उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी रंगनाथराव परशुराम कदम यांनी त्यांच्या एक एकर शेतीत केला आहे़नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव हे गाव फळबागांसाठी प्रसिद्ध आहे़ मोसंबी, संत्रा, चिकू, केशर आंब्याचे विक्रमी उत्पन्न घेवून येथील शेतकऱ्यांनी नावलौकिक मिळविला़ परंतु, मागील काही वर्षांत पाणीपातळी घटल्याने आणि पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथील फळ उत्पादक शेतक-यांच्या संख्येत घट झाली आहे़ मात्र, त्यातही काही शेतकरी लिंबगाव परिसरात अभिनव आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करून लिंबगावची ओळख कायम ठेवत आहेत़लिंबगाव येथील रंगनाथराव कदम यांनी शेतीत अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत़ त्यापैकी सध्या त्यांच्या स्ट्रॉबेरी लागवडीच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे़ कदम यांनी जवळपास एकरभर शेतात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे़ महाबळेश्वरप्रमाणेच मराठवाड्यात पिकणारी स्ट्रॉबेरीदेखील गोड आणि वजनदार असल्याचे कदम यांनी सिद्ध केले आहे़महाबळेश्वर आणि नांदेडच्या तापमानात फार मोठा फरक आहे़ स्ट्रॉबेरीचे उत्पन्न थंड हवामान असणाºया प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते़ परंतु, कदम यांनी नांदेडसारख्या अतिशय उष्ण हवामान असणाºया भागात हा प्रयोग यशस्वी केला आहे़जवळपास एक एकर शेतीमध्ये त्यांनी बेड पद्धतीचा अवलंब करून शेडनेटमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली़ त्यांनी लावलेल्या २२ हजार रोपांपैकी केवळ ३५० रोपे मृत पावली़ तर उर्वरित रोपांची वाढ चांगल्याप्रकारे झाली़स्ट्रॉबेरी शेतीचे लागवडक्षेत्र वाढविणार - कदमशासनाच्या वतीने अनेक पुरस्कार मिळाले़ पण, शेतीत काम करीत असताना नावीन्यपूर्ण प्रयोग आणि आधुनिक पद्धतीने होणारी शेती पाहण्यासाठी इतर भागाच्या शेतीचे अभ्यासदौरे केले़ त्यापैकी पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यासदौरा करताना खूप काही शिकायला मिळाले़ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांची पीकपद्धती, फळबागाकेंद्रित त्यांची शेती हे शिकण्यासारखे आहे़ तेथील शेती पाहूनच स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करण्याचे धाडस करून हा प्रयोग यशस्वी केला़वर्षातून तीनवेळा निघते स्ट्रॉबेरीचे उत्पादनस्ट्रॉबेरी फुलो-यात असताना तापमान ३० अंश व त्यापुढे जात होते; पण अशा वातावरणातदेखील स्ट्रॉबेरी चांगली फुलली.नांदेडसारख्या भागातील हवामान त्यास चांगले मानवले़ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फळ काढणीसाठी आले़ फळांची गोडी, आकारदेखील महाबळेश्वरप्रमाणेच असल्याने स्थानिक ग्राहकांचीच अधिक मागणी झाली़ त्यामुळे जागेवरच २५ टक्के माल विकला गेला आणि उर्वरित माल नांदेडसह मराठवाड्यातील इतर शहरांमध्ये पाठविण्यात आला़ एक एकरमध्ये जवळपास चार लाख रूपयांचे उत्पन्न निघाले़ त्यातून केवळ नफा दोन लाख रूपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले़ एप्रिल महिन्यात पहिला लॉट निघाला़ यानंतर आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा फूलधारणा होईल़ वर्षातून तीनवेळा स्ट्रॉबेरीचे उत्पादन निघते़
महाबळेश्वरच्या धर्तीवर नांदेडातही स्ट्रॉबेरीची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:52 AM
स्ट्रॉबेरी म्हटले की डोळ्यांसमोर महाबळेश्वर येते़ परंतु, नांदेड तालुक्यातील प्रयोगशील शेतक-याने महाबळेश्वरच्या धर्तीवर लिंबगाव येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतून विक्रमी उत्पन्न काढण्याची किमया साधली आहे़ हा प्रयोग उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी रंगनाथराव परशुराम कदम यांनी त्यांच्या एक एकर शेतीत केला आहे़
ठळक मुद्देअभिनव प्रयोग शेतकऱ्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौ-याचे फलित