इच्छुक लागले कामाला
हिमायतनगर - आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करण्यासाठी जमेल तसे परिश्रम घेत आहेत. नगर पंचायतीचा कालावधी जानेवारी महिन्यात संपला. प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर आहेत. एप्रिल महिन्यात निवडणूक जाहीर होईल असा अंदाज आहे. त्यापूर्वीच इच्छुक कामाला लागले आहेत.
इटकरे यांना पुरस्कार
हदगाव - जिल्हा परिषद शाळा रुईधानोरा ता.हदगाव येथील उपक्रमशील शिक्षिका अर्चना इटकरे (खराळे) यांना यावर्षीचा कुसुमताई चव्हाण महिला भूषण पूरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार दिला जातो. इटकरे यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले.
विवाहितेचा छळ
देगलूर - तालुक्यातील मनशक्करगा येथील विवाहितेने ऑटो घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणावेत म्हणून तिचा छळ करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांनी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा नोंदवला. सदर तरुणीचा विवाह गणेशवाडी रिसालाबाजार, हिंगोली येथील तरुणाशी झाला होता.
कोरोनाविषयक आढावा बैठक
मुखेड - तहसील कार्यालयात बुधवारी कोरोनाविषयक आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आ.डॉ.तुषार राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार काशीनाथ पाटील, नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद पाटील, बीडीओ टी.के. भालके, मुख्याधिकारी विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाले, डॉ.दिलीप पुंडे, डॉ.व्यंकट सुभेदार, डॉ.अशोक कौरवार आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी विविध सूचना मांडल्या.
बरबड्यात शुकशुकाट
नायगाव - तालुक्यातील बरबडा येथे शुकशुकाट आहे. किराणा दुकानदारांनी दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवली. त्यानंतर सर्व व्यवहार बंद ठेवले. १२ च्या नंतर शुकशुकाट दिसून आला. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत.
सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन
नांदेड - तालुक्यातील भायेगाव येथे आ.मोहन हंबर्डे यांच्या विकास निधीअंतर्गत ३ लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्यांचे भूमीपूजन पार पडले. रस्त्यावर २ लाख ९९ हजारांचा खर्च येणार आहे. यावेळी तिरुपती पाटील, गंगाधर पाटील, त्रिमुख पाटील, प्रल्हाद पाटील, नंदू पाटील, सोनबा पाटील, गौतम भालेराव, राजू पाटील आदी उपस्थित होते.
रुग्णवाहिका खिळखीळी
भोकर - तालुक्यातील मोघाळी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका पाच वर्षापासून खिळखीळी झाली आहे. याचा त्रास रुग्णांना होत असून आराेग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी होत आहे.
नियमांची पायमल्ली
किनवट - किनवट तालुक्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र सिंदगी मो. त्याला अपवाद ठरले. कोरोनाच्या नियमांची सरळसरळ येथे पायमल्ली केली जात आहे.
तालुकाध्यक्षपदी गाडे
अर्धापूर - स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या अर्धापूर तालुकाध्यक्षपदी गोविंद गाडे यांची निवड झाली. कार्याध्यक्षपदी नदीम शेख, तालुका सचिवपदी काशीनाथ गाडे यांची निवड झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, प्रदेश प्रवक्ते डॉ.बालाजी पेनूरकर, विलास पाटील, गणेश काळम, नांदेड जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, तिरुपती पाटील, नवनाथ पाटील आदी उपस्थित होते.