चौकट- ग्रामीण भागातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेसमोर अनेक अडचणींचा डाेंगर आहे. पावसाळ्यात या शाळांना जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने मुलांना चिखलातून शाळेत जावे लागते. तर शाळेत गेल्यावर त्याठिकाणीही सुविधा नसल्याने योग्य प्रकारे अध्यायन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
चौकट- विद्यार्थ्यांसमोर ज्या अडचणी आहेत, त्याच शिक्षकांच्याही आहेत. शिक्षकांना शाळेत गेल्यानंतर स्वतंत्र स्टाफ रूम नसल्याने त्यांना ताटकळत वर्गखोलीतच बसावे लागते. त्यामुळे शैक्षणिक कामात अडथळे येतात.
चौकट- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची संख्या २ हजार १९५ असून त्यापैकी १४ शाळांना इमारत नाही. तर १ हजार ३९७ शाळेत हेडमास्तर यांना रूम नाही. केवळ ७९८ हेडमास्तर यांना स्वतंत्र रूम आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी २२० शाळेत रॅम्प नाहीत. तसेच ३३६ शाळेत मुलांचे तर ३०५ शाळेत मुलींचे टाॅयलेट नसल्याचे चित्र आहे. ८१ शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही.