स्पर्धा परीक्षेचे तयारी करत असतानाच नोकरी मिळविण्याचीही तयारी केली जाते. तलाठी, ग्रामसेवकासह बँक, रेल्वे, पोस्ट विभागाच्या परीक्षा देऊन संधी शोधली जाते. मात्र, राज्य लोकसेवा आयोगाने अचानक परीक्षा पुढे ढकलली. त्यामुळे आता कोणतातरी एकच पर्याय निवडावा लागणार आहे. त्यातही रेल्वे विभागालाच प्राधान्य देणार आहे. राहुल जमदाडे, नांदेड
राज्यातच कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या. १४ मार्चची परीक्षा तर अवघ्या दोन दिवसांवर आली असताना पुढे ढकलली. या सर्व गोंधळात परीक्षेची केलेली तयारीही व्यर्थ जाते की काय असा प्रश्न आहे. त्या रेल्वेचाही पेपर त्याच दिवशी आला आहे. रेल्वेची परीक्षा देऊन रोजगाराची संधी शोधणार आहे. - अनिरुद्ध जाधव, नांदेड
रेल्वेची परीक्षा बऱ्याच दिवसांनंतर होत आहेत. ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या परीक्षेलाच प्राधान्य देणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी केली होती. मात्र, या गोंधळात रेल्वे विभागाची परीक्षा द्यावीशी वाटत आहे. त्यातूनच एखादी संधी मिळाली तर पुन्हा तयारीला लागता येईल, याविषयी कुटुंबीयांनीही हाच सल्ला दिला. विनायक राजेगोरे, नांदेड