लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वृद्धांची उपेक्षा टाळण्यासाठी, त्यांची काळजी व देखभाल घेण्याबाबत मुलांवर कायदेशीर जबाबदारी व दायित्व टाकण्यासाठी केंद्र सरकारने आईवडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ, कल्याणासाठी २००७ व २०१० मध्ये अधिनियम केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी त्या त्या कार्यक्षेत्रातील पिठासिन अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.उपेक्षित आणि मुलांकडून देखभाल न होणा-या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या अधिनियम २००७ व २०१० अधिनियमाद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील पिठासिन अधिका-याकडे दाद मागता येणार आहे.मुले योग्य देखभाल व काळजी घेत नसल्यास मुलांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूदही या अधिनियमात आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांची चरितार्थ व कल्याणासाठी या अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे.नांदेड उपविभागीय अधिकारी हे नांदेड व अर्धापूर तालुक्यासाठी पिठासिन अधिकारी राहणार आहेत. संपर्क क्र. ०२४६२- २३०९६६, कंधार उपविभागीय अधिकारी कंधार व लोहा तालुका संपर्क क्र. ०२४६६-२२३०५१, देगलूर उपविभागीय अधिकारी देगलूर व मुखेड तालुका (संपर्क क्र. ०२३६३-२५५०३४), बिलोली उपविभागीय अधिकारी- बिलोली व नायगाव तालुका (संपर्क : ०२४६५-२२३१२३), धर्माबाद उपविभागीय अधिकारी- धर्माबाद व उमरी तालुका (संपर्क : ०२४६५-२४४२७९), भोकर उपविभागीय अधिकारी - हदगाव व हिमायतनगर तालुका (संपर्क : ०२४६८-२२२०९९), किनवट उपविभागीय अधिकारी- किनवट व माहूर तालुक्याचे (०२४६९-२२२२२८) पिठासिन अधिकारी राहणार आहेत. केंद्र शासनाच्या या अधिनियमांतर्गत संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे अपिलीय प्राधिकारी नियुक्त करण्यात आल्या आहेत.तक्रारी करता येणारनांदेड जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी हे पिठासिन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या तक्रारी करता येणार आहेत. आईवडिलांच्या आपल्या मुलांसंबंधीच्या तक्रारीही पिठासिन अधिका-यांकडे करता येणार आहेत.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ज्येष्ठांना दाद मागता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:59 AM
वृद्धांची उपेक्षा टाळण्यासाठी, त्यांची काळजी व देखभाल घेण्याबाबत मुलांवर कायदेशीर जबाबदारी व दायित्व टाकण्यासाठी केंद्र सरकारने आईवडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ, कल्याणासाठी २००७ व २०१० मध्ये अधिनियम केला आहे.
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक कायदाउपविभागीय अधिकारी झाले पिठासिन अधिकारी