नांदेड: एसटी बंद (ST Strike ) असल्याने चालत प्रवास करणाऱ्याला चोर समजून मारहाण झाल्याची एक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. किनवट तालुक्यातील कुपटी सोनपेठ या गावात ग्रामस्थ दरोड्यांचे प्रमाण वाढल्याने गस्त घालतात. गावातून चालत जात असताना गैरसमजातून त्यांनी मध्यप्रदेशचा रहिवासी असलेल्या मजुराला बेदम मारहाण केली ( Villagers beating a walking laborer as assuming a thief ) . या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एसटी बंद असल्याने मिलेन त्या खाजगी वाहनाने नागरिकांना प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, खाजगी वाहने याचा फायदा घेत दुप्पट भाडे आकारत आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्या, गरीबांची मोठी तारांबळ उडत आहे. अनेक जन पैसे नसल्याने चालत प्रवास करत असल्याचेही दिसत आहेत. दरम्यान, मुळचा मध्य प्रदेशातील असलेला एक मजूर किनवट तालुक्यातून चालत निघाला होता. दरम्यान, कुपटी सोनपेठ गावात नुकताच एक धाडसी दरोडा झाला होता. त्यामुळे काही युवक गावात गस्त घालत होते. मजूर या गावातून जात असताना गस्त घालणाऱ्या युवकांना त्याच्याबद्दल संशय आला. अनोळखी व्यक्ती असल्याने युवकांनी मजुराला चोर समजून बेदम मारहाण केली.
दरम्यान, पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात व्यक्तीची पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तीने माहिती दिली. मुळचा मध्यप्रदेश राज्यातील असून मजुरीचे काम करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच एसटी बसेस बंद असल्याने चालत प्रवास करत होतो असेही त्याने स्पष्ट केले. यामुळे मारहाणीचा हा प्रकार गैर समजुतीतून घडल्याचे स्पष्ट झाले.