लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगला यांनी बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विद्यानगर येथील आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली़ आर्थिक विंवचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ मृत्यूपूर्वी कनगला यांनी तीन पानी पत्र लिहून ठेवले आहे़ हे पत्र पोलिसांच्या हाती लागले असून त्यावरुन आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे़नांदेडच्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात सुमोहन कानगला हे नावाजलेले होते़ ते महावितरणमध्ये कंत्राटदारीही करीत होते़ बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी व्यायामासाठी जीमला गेल्या होत्या़ त्यावेळी घरात एकटे असताना बेडरुममध्ये कानगला यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली़ तत्पूर्वी दुपारच्या वेळी त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेली परवानाधारक पिस्टल काढून आणली होती़ मृत्यूपूर्वी कानगला यांनी इंग्रजीमध्ये तीन पानी पत्र लिहून ठेवले आहे़ हे पत्र पोलिसांनी जप्त केले़ या पत्रात काही जणांच्या नावांचा उल्लेख असल्याचे समजते़ या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत़घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपअधीक्षक अभिजित फस्के, पोनि़ अनिरुद्ध काकडे यांनी धाव घेतली होती़
नांदेडमध्ये कंत्राटदाराची गोळी झाडून आत्महत्यासुसाईड नोट मिळालीलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगला यांनी बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विद्यानगर येथील आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली़ आर्थिक विंवचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ मृत्यूपूर्वी कनगला यांनी तीन पानी पत्र लिहून ठेवले आहे़ हे पत्र पोलिसांच्या हाती लागले असून त्यावरुन आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे़नांदेडच्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात सुमोहन कानगला हे नावाजलेले होते़ ते महावितरणमध्ये कंत्राटदारीही करीत होते़ बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी व्यायामासाठी जीमला गेल्या होत्या़ त्यावेळी घरात एकटे असताना बेडरुममध्ये कानगला यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली़ तत्पूर्वी दुपारच्या वेळी त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेली परवानाधारक पिस्टल काढून आणली होती़ मृत्यूपूर्वी कानगला यांनी इंग्रजीमध्ये तीन पानी पत्र लिहून ठेवले आहे़ हे पत्र पोलिसांनी जप्त केले़ या पत्रात काही जणांच्या नावांचा उल्लेख असल्याचे समजते़ या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत़घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपअधीक्षक अभिजित फस्के, पोनि़ अनिरुद्ध काकडे यांनी धाव घेतली होती़