नांदेड ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील तुप्पा (ता. जि. नांदेड) येथील रहिवासी रामराव माणिका टिप्परसे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी कर्जाचे ओझे होते. खासगी कर्जाची रक्कम परतफेड करणे शक्य झाले नाही. दरम्यान, रामराव टिप्परसे यांची ८० हजार रुपयांची एक म्हैसही मरण पावली. परिणामी, त्यांचे उत्पन्नाचे साधनही कमी झाले, त्यामुळे प्रचंड निराश होऊन त्यांनी विषारी औषध प्राशन केले. दरम्यान, ही बाब त्यांच्या नातेवाइकांना लक्षात येताच, त्यांनी विषप्राशन केलेल्या रामराव टिप्परसे यांना औषधोपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी औषधोपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी संतोष रामराव टिप्परसे (रा. तुप्पा) यांनी दिलेल्या माहितीचे आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रभारी पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गणेश होळकर हे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
विषारी द्रावण पिऊन मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:18 AM