शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:22 AM

पबजी खेळावरून मित्रांमध्ये वाद शहरातील पिवळी बिल्डिंग परिसरात पबजी खेळत असताना मित्राने शिवीगाळ केल्यानंतर मारहाणीची घटना घडली. आयानखान अकबरखान ...

पबजी खेळावरून मित्रांमध्ये वाद

शहरातील पिवळी बिल्डिंग परिसरात पबजी खेळत असताना मित्राने शिवीगाळ केल्यानंतर मारहाणीची घटना घडली. आयानखान अकबरखान पठाण हा तरुण मित्रासोबत पबजी खेळत बसला होता. यावेळी आरोपीने या ठिकाणी बसू नको, म्हणत शिवीगाळ केली. त्यावरून वाद झाला. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

नांदेड ग्रामीण आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील दूध डेअरी चौक भागातून शेख शोयब शेख कलीम हा तरुण त्याच्या मित्रासोबत एमएच २६, एडब्ल्यू ८७८२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून सिडको ते नावघाटकडे जात होता. दूध डेअरी चौक परिसरात त्यांची दुचाकी आलेली असताना एमएच १४, एएचयू १४६२ या क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगाने यांच्या दुचाकीला धडक दिली. ही घटना ६ जून रोजी घडली. या अपघातात शेख शोयब याचा मृत्यू झाला. या प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद झाला,

तर हदगाव ते उमरखेड रस्त्यावर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. शुभम साहेबराव कदम रा. कारखेड, ता. उमरखेड हा तरुण एमएच २९, बीके ९३३७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून श्रीनिवास पेट्रोल पंप येथे पेट्रोल टाकून परत येत असताना समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याचा वाहनाला धक्का लागला. त्यामुळे तोल जाऊन खाली पडला. या अपघातात जखमी झालेल्या शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.