नांदेड : सुजय पाटील यांचा भाजपा प्रवेश दुर्दैवी बाब असून भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण उचित नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री यांची साम, दाम, दंड, भेद ही निती लोकशाहिला मारक आहे. इतर पक्षातील लोक फोडणे हे उचित नाही. या कृत्याबद्दल मी भाजपाचा निषेध करतो असे खा. अशोक चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज असून शिव सेना,भाजप पेक्षा जास्त जागा काँग्रेस आघाडीला मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्यासाठी आमचे दरवाजे अजूनही खुले आहेत. आणि शेवटपर्यंत खुले राहतील. असे स्पष्ट करीत, नाना पटोले यांना उमेदवारी देवू नये या बद्दलचा मेल राहुल गांधींना नागपूर मधील दलित संघटनांनी पाठविला असल्याबाबत विचारले असता, या विषयी माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांनी सांगितले.