लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानच्या वतीने जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ३० हजार ८५७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने १४ तालुक्यांसाठी पहिल्या टप्प्यात १८ लाख ५६ हजार पाठ्यपुस्तके मिळाली होती़ तर शुक्रवारी उर्वरित हिमायतनगर व अर्धापूर तालुक्यासाठीही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ८९ विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान कक्षाच्या वतीने पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी शाळा सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात येते़ योजनेंतर्गत २१ लाख ३० हजार ८५७ पाठ्यपुस्तकांची मागणी यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी करण्यात आली होती. दरम्यान, २४ मे पर्यंत शासनाच्या वतीने १८ लाख ५६ हजार ३६ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सदर पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी केले जाणार आहे.दरम्यान, बिलोली तालुक्यातील मराठी माध्यमांच्या शाळांसाठी ९२ हजार ५३७ तर उर्दू माध्यमातील शाळांसाठी ३ हजार २६ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. तसेच धर्माबाद तालुक्यातील मराठी माध्यमासाठी ४९ हजार ३९६ तर उर्दू माध्यम- ७ हजार २७४, नायगाव तालुक्यातील मराठी- १ लाख १२ हजार ६०० तसेच देगलूर तालुक्यातील मराठी- शाळांसाठी १ लाख २६ हजार ९७ तर उर्दू -१० हजार ७७० पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत.त्याचप्रमाणे नांदेड तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी ९९ हजार ५८९ तर उर्दू माध्यमाची ५ हजार ५९८, अर्धापूर तालुका- मराठी- ६४ हजार ३१३, उर्दू- ११ हजार ४६४, मुदखेडात मराठी-७५ हजार ७२५ तसेच उर्दू माध्यमाची ७ हजार १०१ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. किनवट येथील मराठी माध्यमासाठी १ लाख ६० हजार ७००, उर्दू माध्यमांची १० हजार ११६, माहूर येथील मराठी शाळांसाठी ६६ हजार ६२७, उर्दूसाठी ३ हजार ९४९ तसेच हदगावातील मराठी शाळांसाठी १ लाख ६२ हजार ३६७, उर्दू शाळांसाठी ५ हजार ४२७, हिमायतनगर - ७० हजार ७०० तर उर्दू माध्यमासाठी २ हजार १८१, मुखेड येथील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी २ लाख ६५ हजार सहा तर उदू शाळांसाठी २ हजार १८१ तर उर्दू शाळांसाठी ३ हजार ८९९, भोकर येथील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी ९४ हजार २४६ तर उर्दू - ६ हजार ४२३, उमरी- मराठी, ६७ हजार २९४ तसेच उर्दू- ५२०, कंधार येथे मराठी- १ लाख ५५ हजार ५१६ तर उर्दू- ४ हजार ६३४ तसेच लोहा- मराठी- १ लाख ८५ हजार ५५ तर उर्दू- ८८६ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत़दोन तालुक्यांनाही पुस्तके मिळाली आहेत, त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हाती नवी पुस्तके असतील़
नांदेड जिल्ह्यासाठी २१ लाख पुस्तकांचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:03 AM
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानच्या वतीने जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ३० हजार ८५७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने १४ तालुक्यांसाठी पहिल्या टप्प्यात १८ लाख ५६ हजार पाठ्यपुस्तके मिळाली होती़ तर शुक्रवारी उर्वरित हिमायतनगर व अर्धापूर तालुक्यासाठीही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नवीन पाठ्यपुस्तके