शहरं
Join us  
Trending Stories
1
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
2
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
3
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
4
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
5
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
6
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
7
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
8
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
9
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
11
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
12
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
13
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
14
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
15
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
16
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
17
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
18
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
19
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
20
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ‘बाभळी’ बंधा-याचे दरवाजे आज बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 4:53 PM

नांदेड जिल्ह्यातील धमार्बाद तालुक्यातील बाभळी बंधा-याचे १४ दरवाजे २९ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ञिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबंधारा पुर्ण व उदघाटन होऊन चार वर्ष उलटुनही हरितक्रांतीचे स्वप्न अपुर्णचदोनच सुरक्षारक्षकावर बंधा-याची सुरक्षा बंधा-याच्या ठिकाणी वर्षभरापासुन लाईटची सोय नाही,बंधा-याकडे जाणारा रस्ताही उखडला

धमार्बाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील धमार्बाद तालुक्यातील बाभळी बंधा-याचे १४ दरवाजे २९ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ञिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात येणार आहे. या बंधा-यात सध्यस्थितीत १.३६२ दशलक्ष घनमीटर अथवा अडीच मिटर  एवढा उपलब्ध पाणी साठा अडविण्यात येणार आहे. 

देशभरात गाजलेल्या महाराष्ट्र व तेलगंणा राज्यातील बहुचर्चित बाभळी बंधा-याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार बंधा-याचे  दरवाजे दरवर्षी १ जुलै ते २८ आॅक्टोबर या पावसाळ्याच्या कालावधीत उघडे राहतील व २९ आँक्टोबर ते ३० जूनपर्यंत दरवाजे बंद राहतील. या कालावधीत उपलब्ध असलेल्या जलसाठ्यापैकी १ मार्च रोजी ०.६  टिएमसी पाणी तेलगंणा राज्यात सोडण्यात यावे असा निकाल दिला. त्यानुसार याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात येत आहे.त्यानुसार  २९ आॅक्टोबर रोजी बंधा-याचे दरवाजे बंद करून उपलब्ध १.३६२ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा अडविण्यात येणार आहे.

बाभळी बंधारा होऊन व त्याचे उदघाटन २९ आॅक्टोबर २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बंधा-यात जलसाठा उपलब्ध होता पण त्यानंतर गेल्या चार वर्षात अल्प पाऊस असल्याने कोरडेच दरवाजे बंद उघडणे होते.  यावर्षी समाधानकारक पाऊस व जायकवाडी व विष्णुपुरी धरणातुन पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्यामुळे बाभळी बंधा-यात पाणीसाठा उपलब्ध आहे. 

दरम्यान, बाभळी बंधा-यातील उपलब्ध पाणीसाठ्याचे महाराष्ट्र शासन योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे परिसरातील शेतक-यांची जवळपास ८000 हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन हरितक्रांती होण्याचे स्वप्न सध्या तरी स्वप्नच राहीले आहे. याचबरोबर गेल्या अनेक वषार्पासुन बंद अवस्थेतील  १२ जलसिंचन प्रकल्प (लिफ्ट इरिगेशन)  सुरू केल्यास त्याचा फायदा शेतक-यांना मिळणार आहे. याकडे सुद्धा शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आघाडी सरकारने व आताच्या भाजपा सरकारने बाभळी पाणीप्रश्नी अद्याप पुनर्याचिका दाखल केली नाही, म्हणून दरवर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत बंधा-याचे दरवाजे उघडे ठेवावे लागत आहे़ परिणामी पाण्याचा उपयोग होत नाही. दहा टक्के शेतकरी या पाण्याचा वापर करत नाही बारा जलसिचंन प्रकल्प सुरु करणे गरजेचे आहे असे मत बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव डॉ.प्रा.बालाजी कोंम्पलवार यांनी लोकमतला माहिती दिली.  

बंधा-याची सुरक्षितता वा-यावर....महाराष्ट्र व तेलगंणा राज्यात बाभळी बंधारा निर्मितीपासुन वाद असताना  बंधा-याच्या सुरक्षिततेबद्दल महाराष्ट्र शासन उदासीन आहे.दोनच सुरक्षारक्षकावर बंधा-याची सुरक्षा असल्याने या निमित्ताने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्ष भरापासुन बंधारा व परिसरात विद्युतची सोय नसल्यामुळे जवळपास ७० ते ८० विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे बंधारा परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाकडुन दरवाजे बंद करणे व उघडण्याच्या तारखेच्या वेळी विद्युत ची सोय केली जाते.  बाभळी बंधारा पूर्ण होऊन व त्याचे उदघाटन होऊन चार वर्षांचा कालावधी संपला. बंधा-यात पाणी अडविणे व सोडून देणे हा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्र सरकार करीत आहे. 

बंधा-याकडे जाणा-या रस्त्याची दुर्दशा

बाभळी बंधा-याकडे जाण्यासाठी बाभळी गावापासुन ते बाभळी बंधारा पर्यंत रस्ता बनविण्यात आला. त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असुन रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे- झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे ये-जा करणा-यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

बाभळी बंधारा बचाव कृती समितीचे सचिव डाँ.प्रा.बालाजी कोंपलवार यांनी महाराष्ट्र शासनाने बंधा-याचे दरवाजे लावण्याच्या तारखा बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका लवकरात लवकर दाखल करावी अशी मागणी केली. सध्या बाभळी बंधारा परिसरात १.३६२ दशलक्ष घनमीटर म्हणजे .०४८ टीएमसी एवढा जलसाठा उपलब्ध असल्याची माहीती नांदेड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रशांत कदम करखेलीकर यांनी दिली.१.३६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सध्या बंधा-यात शिल्लक.