बोधनकर रूजू
कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ.नरेश बोधनकर ६ फेब्रुवारी रोजी रूजू झाले. सध्या डॉ.बालाजी सातमवाड व डॉ. विनोद माहुरे सेवा देत आहेत. येथे २ जागा रिक्त होत्या. त्यातील एक बोधनकर यांच्या रुपाने भरण्यात आली.
रक्तदान व आरोग्य शिबिर
मुदखेड - जगद्गुरू सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त २३ फेब्रुवारी रोजी मुदखेड येथे रक्तदान व आरोग्य शिबिर ठेवण्यात आल्याची माहिती डॉ.जगदीश राठोड यांनी दिली. यावेळी रोहिदास जाधव, उत्तमराव चव्हाण, किशन राठोड, मानसिंग राठाेड, दिलीप पवार, सीताराम चव्हाण, रावसाहेब नायक, भाऊसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
तिघांची मुक्तता
नांदेड - बस चालकाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली तीन जणांविरूद्ध दाखल ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्यातून पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. खरात यांनी तिघांची मुक्तता केली. १५ मार्च २०१६ रोजी माहूर टी पॉईंटवर ही घटना घडली होती. चालक शंकर हुमने यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. ऋषीकेश सोनकुसरे, सागर काण्णव, प्रवीण पोेटेकर या तिघांची मुक्तता झाली.
डॉक्टर गैरहजर
माहूर - आष्टा प्राथिमक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. दरम्यान, जि.प. सदस्य समाधान जाधव, तालुका आरोग्य अधिकारी एस.बी. भिसे यांच्या भेटीतही उपरोक्त बाब निष्पन्न झाली.
हंबर्डे यांची भेट
नांदेड - जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने आ.मोहन हंबर्डे यांची भेट घेऊन जुनी पेंशन लागू करण्यासाठी विधानसभेचे लक्ष वेधावे अशी मागणी केली. शिष्टमंडळात संदीप मस्के, पुष्पराज राठोड, वसंत जारीकोटे, शिवकुमार देशमुख, किशोर नरवाडे, संजय कलेपवार, राम ब्याळे, गोविंद उचले, हनुमंत जोगपेठे आदींचा समावेश होता.
अध्यक्षपदी देशमुख
हदगाव - सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. दिगंबर देशमुख तर सचिवपदी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सुमित्रा जगताप यांची निवड झाली. स्वागताध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे दत्तात्रय पवळे व संभाजी बिग्रेडचे किरण वानखेडे यांची निवड झाली.
रस्त्याची दुरवस्था
हदगाव - तालुक्यातील बामणीफाटा ते करमोडी रस्त्याची दुरवस्था झाली. तीन कि.मी. अंतरावर खड्डेच खड्डे पडले आहेत. नागरिकांना ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.