किनवट : चिखली बु. ता. किनवट येथे गतवर्षी १ फेब्रुवारी रोजी वनविभागाने ‘आॅपरेशन ब्लू मून’तंर्गंत राबविलेल्या मोहिमेत ४० लाखांचे २८ ट्रॅक्टर व १ टेम्पोतील असे एकूण ५९ घनमीटर सागवान जप्त करण्यात आले. किनवट पोलिसांत याप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला होता. यातील ९ जणांनी स्वत:हून सोमवारी अटक करवून घेतल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांनी दिली.यातील केवळ १ आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. आता एकूण १० आरोपी अटकेत आहेत. जेव्हा जेव्हा आरोपींना पकडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करुन आरोपी पसार व्हायचे. तस्करांवर जबर बसावा, यासाठी यापूर्वीच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी मागणी करण्यात आली होती. ती मिळाल्याने फरारी आरोपींचे मनोबल खचले, ९ जणांनी सोमवारी स्वत:हून अटक करवून घेतली. आणखी १५ आरोपी पसार आहेत. त्यांनाही लवकरच पकडण्यात यश येईल, असे नाळे म्हणाले.शेख वसीम शेख गणी, शेख कादर शेख अजगर, शेख अफसर शेख मौनू, शेख खैरु शेख नबी, शेख मुस्तफा शेख सुभान, शेख सरदार शेख मुराद, शेख फारुख शेख मुस्तफा, शेख जाकेर शेख अब्दुल्ला, तिरुपती मुकेलवार अशी आरोपींची नावे आहेत.
नऊ सागवान तस्करांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:16 AM
चिखली बु. ता. किनवट येथे गतवर्षी १ फेब्रुवारी रोजी वनविभागाने ‘आॅपरेशन ब्लू मून’तंर्गंत राबविलेल्या मोहिमेत ४० लाखांचे २८ ट्रॅक्टर व १ टेम्पोतील असे एकूण ५९ घनमीटर सागवान जप्त करण्यात आले. किनवट पोलिसांत याप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला होता.
ठळक मुद्देगतवर्षीच्या ‘आॅपरेशन ब्लू मून’ मधील आरोपी