शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

एफआरपीची रक्कम जमा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:20 AM

नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगाम २०१८-१९ मधील उसाची एफआरपीची रक्कम अद्याप अदा केली नाही. शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयापुढे सोमवारी आंदोलन केले.

ठळक मुद्देकारखान्यावरील एंट्री शुल्क थांबवण्याची मागणी

नांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगाम २०१८-१९ मधील उसाची एफआरपीची रक्कम अद्याप अदा केली नाही. शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयापुढे सोमवारी आंदोलन केले.राज्याच्या साखर आयुक्तांनी ६ मे २०१९ रोजी परभणी जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर आरआरसीचे आदेश पारित केले आहेत. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा न केल्याने हे आदेश पारित करण्यात आले होते. एफआरपीची रक्कम सर्वच साखर कारखान्यांनी शेतक-यांना दिली पाहिजे, असा कायदा असतानाही साखर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने कारखानदार कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप स्वाभिमानीने केला आहे.ज्या कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाली अशा कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्यास १५ टक्के व्याजआकारणी करुन शेतकºयांना ही रक्कम द्यावी, कारखान्यावर जात असलेल्या ऊसाच्या गाडीला इंट्रीपोटी ५०० ते ७०० रुपये घेतले जात आहेत ते बंद करावेत, आदी मागण्याही करण्यात आल्या. या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात.शेतकºयांच्या खात्यावर एआरपीची रक्कम जमा करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, हिंगोली जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, नांदेड जिल्हाध्यक्ष किशनराव कदम, हनुमान राजेगोरे, केशव आरमळ, उस्मान पठाण, लक्ष्मण शेरे, दिपक भालेराव, बाळासाहेब घाटोळ, ज्ञानेश्वर बोंढारे, ज्ञानोबा लोखंडे, नामदेव मोहिते, ऋषिकेश बर्वे, रामराव मोहिते, अब्दुल रऊफ, संभाजी खानसोळे आदींची उपस्थिती होती.दुष्काळामुळे शेतकरी हवालदिलसततच्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्यांनी शेतक-यांचा ऊस नेवून ३ ते ४ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही एफआरपी रक्कम शेतक-यांना वेळेवर दिली जात नाही. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतक-यांकडे पैसे नाहीत, बँका पीककर्ज देत नाहीत, अशा परिस्थितीत शेतक-यांवर खाजगी सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना