लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? सरपंच, ग्रामसेवक लक्ष देत नाहीत, नळपट्टी ,घरपट्टी देतो़ मग गावात पाणी का मिळत नाही? आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, मूलभूत सुविधा गावात मिळत नसतील तर ग्रामपंचायत कोणत्या कामाची, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना धारेवर धरले. त्यावेळी पवार यांनी प्रश्नांचे सविस्तर उत्तरे देवून समाधान केले़ येत्या एक - दोन दिवसांत पाण्याची व्यवस्था करू, असे आश्वासनही त्यांनी दिले़ त्यामुळे ग्रामस्थांनी मोर्चा मागे घेतला.दरम्यान, गटविकास अधिकारी पवार यांनी सरपंच विजय गिरी यांना ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड गायब होणे, मोटर चोरीला जाणे, जे कोणी पाईप फोडत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? यासंदर्भात प्रश्न विचारले़ मी माझ्या पद्धतीने कारवाई करीत आहे, तुम्ही काय करत आहे, असे म्हणत गटविकास अधिकाºयांनी सरपंचांना धारेवर धरले. गावातील राजकारणामुळे सर्वसामान्य, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम राजकारणी लोकांनी करू नये हे योग्य नाही. राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचेही गटविकास अधिकारी यांनी सरपंचाला सांगितले़मोर्चात सरपंच विजय गिरी, शंकर बोंबले, दत्ताहारी शेळपुरी, हणमंत पाटील, किशन तुरे, प्रतिमा वाघमारे, गंगुबाई आंबेकर, लक्ष्मीबाई तुरे, अशोक तुरे, हानमंत तुरे, शंकर येताळे, कोंडिबा तुरे, राजू तुरे, जळबा तुरे,विलास तुरे, विठ्ठल तुरे, शेषराव रोन्टे, लक्ष्मण रोन्टे, सुनीता तुरे, संगीता तुरे,मरूबाई रोडेवार, श्याम तुरे, देऊबाई रोडेकर, सुनीता रोन्टे, गंगाधर तुरे, अशोक तुरे, पौर्णिमा तुरे, तुळसाबाई तुरे, सावित्रीबाई आंबेकर, दिलीप तुरे, तुळसाबाई रोन्टे भारतबाई तुरे, गंगूबाई आंबेकर, महादाबाई रोन्टे, पद्मीनबाई आंबेकर, अनुसयाबाई आंबेकर, सुनीता रोन्टे, देऊबाई रोडेकर, दीक्षा तुरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
पाटोदा ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:52 AM
लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? ...
ठळक मुद्दे पंचायत समितीवर घागरमोर्चा दोन महिन्यांपासून पाणीटंचाई; गटविकास अधिका-यांना विचारला जाब