भोकर - शहरातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांनी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या खावटी अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी केले आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करीता नगरपरिषद कार्यालयात शहर समिती स्थापन करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती करीता असलेल्या खावटी अनुदान योजने अंतर्गत ४ हजार रुपये रोख व वस्तू स्वरूपात लाभ देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी पुढील कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यात पीव्हीटीजी (कातकरी/कोलम/ माडीया गोंड), पारधी, रोजगार हमी योजनेतील जॉब कार्ड, गरजू आदिवासी कुटुंब अ) आदिवासी परितक्त्या किंवा घटस्फोटित महिला, विधवा महिला. ब) अपंग व्यक्ती असलेले कुटुंब क) अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब. ड) भूमिहीन मजूर हक्क कुटुंब. या करीता नगर परिषद कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून योजनेच्या अधिक माहिती करिता मदत कक्षाचे नियुक्त कर्मचारी डी. एम शातलवार, एस. बी. राजकोंडवार सुनील रामराव कल्याणकर यांच्याशी संपर्क साधावा.