लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मतदारयादी अचूक व शुद्ध करण्यात बीएलओंची महत्त्वाची भूमिका आहे. आताच मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमात सतर्कतेने काम केल्यास पुढील काळातील तक्रारी, अडचणी दूर होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.तालुक्यातील नांदेड ८६ उत्तर व ८७ दक्षिण मतदारसंघातील बीएलओ यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शंकरराव चव्हाण सभागृहात पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी उपस्थित बीएलओ यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. प्रास्ताविक नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी केले. यावेळी त्यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगत नांदेड तालुक्यातील मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या विविध पैलूंवरील प्रगती सांगितली.त्यानंतर आॅक्सफर्ड द ग्लोबल शाळेतील निवडणूक साक्षरता मंडळाच्या वतीने स्पर्धेतील एक सर्वोत्तम पॉवर पॉईंट सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देवून कौतुक केले व असे उपक्रम ईलसी क्लबमार्फत सर्व स्तरावर राबविले जावेत, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.त्यानंतर जिल्हाधिकारी नांदेड यांनी उपस्थित बीएलओ यांच्याशी संवाद साधत पर्यवेक्षक, बीएलओ यांच्या कामाचा आढावा घेतला.यावेळी बीएलओ अर्थात ब्लॉक लेवल आॅफीसर यांनी आपल्या शंकाही उपस्थित केल्या. त्या शंका प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. तसेच काही उपस्थित बीएलओ यांनी आपापल्या केंद्रात केलेल्या कामाची माहिती जिल्हाधिकारी यांना याप्रसंगी दिली.त्यानंतर नायब तहसीलदार निवडणूक स्नेहलता स्वामी यांनी पॉवर पॉईंन्ट सादरीकरणाद्वारे बीएलओ यांचे प्रशिक्षण घेत मतदारयादी अद्ययावतीकरण कोणत्या अधिनियमाखाली केली जाते, काही संविधानिक तरतुदी व कायदेशीर बाबीसह बीएलओ कोण, त्यांच्या जबाबदाºया, कर्तव्य यासोबतच विविध अर्जांची माहिती सांगून पुनरिक्षण कार्यक्रमात करावयाचे कामकाज याबाबत प्रशिक्षण दिले.बीएलओ हे पद अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी स्वत:चे कर्तव्य, जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी व मतदारयादी अचूक, शुद्ध करण्यात मोलाची भूमिका निभवावी, असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी व तहसीलदार अंबेकर यांची उपस्थिती होती.याप्रसंगी दोन्ही मतदारसंघातील सर्व पर्यवेक्षक व पाचशे नव्वद बीएलओ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन नायब तहसीलदार (निवडणूक) स्नेहलता स्वामी यांनी केले.
लोकसभा निवडणुकीची तयारीआगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही मतदार यादी राहणार आहे. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानंतर मतदार यादी कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनाही लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदार यादीत नावे समाविष्ठ करणे, दुरुस्त करणे, वगळणी, आक्षेप आदी बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. प्रशासकीय स्तरावरील तयारीप्रमाणे राजकीय मंडळीही तयारीला लागले आहेत.