शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
3
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
4
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
5
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
6
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
7
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
8
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
9
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
10
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
11
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
12
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
13
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
14
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
15
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
16
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
17
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
18
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
19
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
20
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 6:43 AM

गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या सात जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड (जि. नांदेड) : तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागांवर नोकरीचे आमिष दाखवून मुखेड तालुक्यातील १६ जणांना १ कोटी १४ लाख रुपयांनी गंडविण्यात आले. या प्रकरणात मुखेड पोलिस ठाण्यात कामगार आयुक्तालयातील क्लास वन अधिकाऱ्यासह सात जणांविरुद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोविंदराव गिरी यांनी या प्रकरणात मुखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गिरी हे केंद्रप्रमुख असून, त्यांच्या दोन्ही मुलांना तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष पाहुणे असलेल्या रामदास गोपीनाथ शिंदे यांनी दाखविले होते. कामगार आयुक्त कार्यालयात असलेले क्लास वन अधिकारी पवनकुमार चव्हाण, कल्पेश रविकांत जाधव यांच्याशी ओळख करून देत अनेकांना नोकरी लावल्याचे गिरी यांना सांगितले. तलाठी पदाची परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीमार्फत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार गिरी यांनी जावेद तांबोळी याला दहा लाख रुपये दिले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये बोलावून आणखी दहा लाख गिरी यांच्याकडून घेतले.

मुलाने केले होते चित्रीकरणnगिरी यांना ११ सप्टेंबर रोजी आणखी दहा लाख रुपये घेऊन वाशी येथे बोलावण्यात आले होते. वाशीतील मार्केट यार्डात ते पैसे घेऊन थांबल्यानंतर त्याठिकाणी जावेद तांबोळी, रामदास शिंदे व कल्पेश जाधव हे आले. nत्या तिघांनी गिरी आणि त्यांच्या मुलाला विश्वा लॉजमध्ये नेले. याठिकाणी आरोपींना दहा लाख रुपये देत असताना गिरी यांच्या मुलाने लपून मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते.

निकाल लागला, पण मुलाचे नावच नाहीजानेवारी २०२४ मध्ये तलाठी पदाच्या परीक्षेचा निकाल लागला, मात्र त्यात यातील एकाचेही नाव नव्हते. त्यामुळे गिरी यांनी चव्हाण यांच्यासह सर्वांना फोनवरून विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गिरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइलवर पाठविली गुणपत्रिका अन्...nपवनकुमार चव्हाण याने मुलाचे गुण वाढविल्याचे सांगत त्याची प्रिंट गिरी यांच्या मोबाइलवर पाठवली. आणखी काही मुले असतील तर घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर गिरी यांनी ओळखीतील काही जणांना सांगितले. nसीमा जाधव, रवी राठोड, जगदीश आडे या तिघांचे ३० लाख रुपये आरोपींना देण्यात आले. अशाप्रकारे सोळा उमेदवारांकडून सात जणांनी १ कोटी १४ लाख रुपये उकळले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण