सेनगाव : शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.भिषण पाणीटंचाईने ग्रासलेल्या सेनगाव शहरात जानेवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. यंदा येथे बिकट स्थिती होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना म्हणून पाच शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु या टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. तालुक्यात जुलै उजाडला तरी मोठा पाऊस नाही. नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक असताना प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असून मागील तीन दिवसांपासून शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. एक जुलैपासून शहरात टँकर आले नसल्याने सर्व भागात पाणीटंचाई भिषण बनली आहे. पावसाने पाठ दाखवली असताना दुसरीकडे टँकर बंद झाल्याने शहरवासीयांवर दुहेरी संकट ओढावले आहे. तीन दिवसांपासून पाण्यासाठी भंटकती सुरू आहे. नागरिक प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त करीत आहे. शहरात बनलेला भिषण पाणी टंचाईचा अनुषंगाने येथील नगराध्यक्ष संदीप बहिरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून टँकरला मुदतवाढ देण्याची मागणी केली. परंतु या मागणीची प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली नसल्याने सरते शेवटी शहरात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नगरपंचायतच्या वतीने टँकरला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले. परंतु अद्याप कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नसल्याने टँकरच्या मुदतवाढीसंदर्भात प्रशासन केव्हा निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरात भीषण पाणीटंचाई; मोठा पाऊसही नाहीसेनगाव तालुक्यात जुलै उजाडला तरी अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाले, विहीर-बोअर, तलाव कोरठेठाक आहेत. त्यामुळे येथील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. येथील पाणीप्रश्न पाहता प्रशासनाने टँकरला तातडीने वाढीव मुदत देण्याची गरज होती. या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून सेनगाव शहरात पाणीटंचाईने गंभीर रुप धारण केले आहे. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले. टँकरचा कालावधी ३० जूनला संपला असल्याने शहरातील टँकरचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 1:01 AM
शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे.
ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती सेनगाव शहरातील तीन दिवसांपासून पाणीप्रश्न गंभीर