विवेकानंद जयंती
मुखेड : येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाकडून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिणे, प्रा. सी.बी. साखरे, उपप्राचार्य के. बालाराजू, अधीक्षक एस.के. सूर्यवंशी उपस्थित होते. या वेळी शिक्षकेतर कर्मचारी दीनानाथ नालापल्ले यांचा सत्कार करण्यात आला.
बाऱ्हाळीत मॅटी यांची जयंती
बाऱ्हाळी : इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे जनक डॉ. काऊंट मॅटी यांची २१२ वी जयंती बाऱ्हाळी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला डॉ. सुशील देशमुख, डॉ. सुरेश पाटील, डॉ. गंगाधर पाटील, डॉ. संदीप पवार, डॉ. मेराज कादरी, डॉ. रमेश राठोड, डॉ. ज्ञानेश्वर भेंडेगावकर, राघवेंद्र देशमुख, संतोष पाटील, सचिन पाटील, महादेवी लिंबोरे, व्यंकट पाटील उपस्थित होते.
चिकनचे दर घसरले
नायगाव : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात चिकनच्या दरात मोठी घसरण झाली. जिल्ह्यातील अनेक भागांत पक्षी व कोंबड्या दगावल्याच्या घटना घडत असल्याने बर्ड फ्लूचे संकट वाढले असून अनेक जण चिकन खाण्यास धजावत नाहीत. मटनाचे दर मात्र स्थिर आहेत. बर्ड फ्लूचा फटका पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रशिक्षण
किनवट : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण गोकुंदा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडले. निवडणूक निरीक्षक म्हणून हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर होते. त्यांनी सहभागी ३५९ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या कामात कोणीही हयगय करू नये अन्यथा गुन्हे नोंदवू, असा इशारा त्यांनी दिला.
प्रशासन सज्ज
हदगाव : तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. २९७ मतदान केंद्रांवर १२०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले, अशी माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली. तामसा, निवघा, मनाठा, पिंपरखेड, पळसा, हडसणी, बनचिंचोली, डोंगरगाव, लिंगापूर आदी गावे संवेदनशील म्हणून ओळखली जातात.
जिजाऊ जयंती साजरी
देगलूर : तालुक्यातील सोमूर येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला दिगंबरराव पाटील, सोपानराव पाटील, उद्धवराव ढोबळे, संकेत पाटील, माराेती रॅपनवाड, व्यंकटराव बोंडगे, जयपाल रेड्डी, दीपक बिरादार, विष्णू बिरादार, दिलीप बिरादार, पवन कुंडले, विठ्ठल कोकणे, मीनाबाई पाटील, सुलोचना पाटील, ज्योती पाटील, अनुषा पाटील, शीला ढोबळे आदी उपस्थित होते.
दोन म्हशींची चोरी
बिलोली : बिलोली तालुक्यातील दौलापूर शिवारात चोरट्यांनी दोन म्हशी लांबविल्याची घटना १२ रोजी रात्री घडली. नामदेव पाटील व मोहनराव मोरे यांच्या म्हशी होत्या. परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
लोह्यात दुचाकीची चोरी
लोहा : येथील रहिवासी शंकर कानोडे यांनी त्यांची दुचाकी ग्रामीण बँकेसमोर उभी केली होती. ११ जानेवारी रोजी दुपारी चोरट्यांनी ती लंपास केली. लोहा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. तपास सुरू आहे.
प्रतिमा दिली भेट
किनवट : येथील पोलीस ठाण्याला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देऊन पोलीस ठाण्यामध्ये जिजाऊ व विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक मारोती थोरात, फौजदार गणेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, गजानन कोल्हे, फुलाजी गरड, मारोती सुंकलवाड, सुनील गरड, अनिल पाटील, वैजनाथ करपुरे, उमाकांत कराळे आदी उपस्थित होते.