शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

लस घेतलेली नाही? मग आमच्या गावात प्रवेश नाही! नांदेडमधल्या 'या' गावाची देशात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 5:42 PM

लस न घेता गावात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला

हिमायतनगर : नांदेड जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला टेंभूर्णीकरांनी चांगला प्रतिसाद देत गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण केले. याशिवाय लस न घेता गावात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही गावकऱ्यांनी घेतला. टेंभूर्णीकरांनी राबविलेला हा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी राबविणे आवश्यक आहे. असे झालेच तर जिल्हा १०० टक्के लसवंत होईल, यात शंका नाही.

ग्रामीण भागात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सरपंच यशोदाबाई पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील व उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, ग्रामसेवक अनिल कदम, लहाने, बांगर, आशा अणि अंगणवाडी ताई यांना ही माहिती दिली. सरपंच यशोदाबाई पाटील यांनी जातीने लक्ष घालून गावातील नागरिकांशी चर्चा सुरू केली. सोबत ग्रामसेवक अनिल कदम, शाळेचे मुख्याध्यापक लहाने, पावनमारी शाळेचे मुख्याध्यापक बांगर, पोलीस पाटील किसनराव जाधव, शिवाजी जाधव, अंगणवाडी, आशा वर्कर्स, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील, स्वच्छता समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव पाटील या सर्वांच्या मदतीने घरोघरी जाऊन १८ वर्षांवरील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, स्थलांतरित, कामासाठी बाहेर गेलेले ही सर्व माहिती उपलब्ध करून घेतली आणि गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले.गावात आज १०० टक्के पहिला डोस अणि ७५ टक्के दुसरा डोस असे लसीकरण झाले. गावांत येणारे फेरीवाले, भाजीपाला विकणारे, नातेवाईक यांना केंद्रात लस देऊन प्रवेश दिला जातो. लस न घेण्याऱ्यांना टेंभूर्णी गावात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच या संदर्भातला सर्व आढावा घेऊन गावातील नागरिकांना नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनबद्दल माहितीही देण्यात आली. आपला गाव परत तिसऱ्या लाटेकडे जाऊ नये यासाठी लस घेणे आवश्यक आहे असे समजावले.

१०० टक्के लसीकरण राबवण्यासाठी उपआरोग्य केंद्र विरसणी येथील सीएचओ भालेराव, एमपीडब्ल्यू तुकाराम पौरे , सिस्टर काळे, ग्रामसेवक आनंद कदम, बापूराव माने, प्रभाकर माने, सुरेश देवसरकर, स्वस्त धान्य दुकानदार सुरेश पाटील, उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, शिवाजी जाधव, किशनराव जाधव, विनायक माने, बाबुराव माने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास देवसरकर, ग्रामपंचायत सेवक किशोर कांबळे, अंगणवाडी आशा वर्कर्स अणि गावातील सर्व तरुण मंडळी, प्रतिष्ठित नागरिक अणि महिला मंडळी या सर्वांनी सहकार्य केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस